मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सन 2025/26 दिनांक 17.9.2025 रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन ग्रामपंचायत येणेरे हनुमान सभागृह येथे करण्यात आले याप्रसंगी येणेरे गावातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. ग्रामसभेमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवणे बाबत सविस्तर चर्चा झाली त्यानुसार या अभियानात भाग घेण्याचे आजच्या ग्रामसभेत सर्वानुमते ठरले. यानंतर ग्रामपंचायत अंतर्गत विविध विभागांचा आढावा घेण्यात आला. जल जीवन मिशन अंतर्गत हर घर नल हर घर जल घोषित करणे बाबत ठराव करण्यात आला. मौजे येणेरे गाव शिवारातील शिवार फेरीनुसार शिवपानंद रस्त्यांच्या यादीचे वाचन करून त्यास मान्यता देण्यात आली. ग्रामपंचायत अंतर्गत घर मिळकतींच्या करवसुली च्या संदर्भात QR कोड चे उद्घाटन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. पोस्टल अपघात विमा चे ग्रामसभेत माहिती देण्यात आली. या ग्रामसभेत प्लास्टिक बंदीची घोषणा करण्यात आली दंडात्मक कारवाई बाबत सुचना दिल्या.मौजे येणेरे येथील माजी पं. स. सभापती श्री. बाजीराव ढोले, श्री. उल्हास नवले सह आजी माजी ग्रामपंचायत पदाधिकारी व 170 ग्रामस्थ बंधू -भगिनींनी सहभाग घेऊन ग्रामसभा ही यशस्वी पार पाडण्यामध्ये सहभाग घेतला. एक दिवस स्वच्छते साठी शनिवार चा दिवस ठरविण्यात आला आणि स्वच्छ सुंदर हरित प्लास्टिक मुक्त येणेरे करण्याचा ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांचा निर्धार झाला.आजच्या सभेसाठी विस्तार अधिकारी कोंढवळे जुन्नर प.स.जुन्नर उपस्थित राहून अभियानाबाबत मार्गदर्शन केले.मंडल अधिकारी श्री.अडसरे यांनी शिव पाणंद रस्ते बाबत माहिती दिली. हि विशेष ग्रामसभा सरपंच श्री.अमोल भुजबळ यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. हि सभा यशस्वी करण्यासाठी उपसरपंच जितेंद्र ढोले, ऋषीं वर्पे, विश्वास काळे, मीनल ढोले,सुषमा चवरे,
ग्रामपंचायत अधिकारी रवींद्र मलघे यांनी विशेष प्रयत्न केले. ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ यांनी ग्रामसभा यशस्वी पार पाडल्याबाबत डॉ. श्री. दिलीप ढोले यांनी सर्वांचे आभार मानले.