नारायणगाव : (प्रतिनिधी ) वारूळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील महाविद्यालय रस्त्यालगत असलेल्या साईधाम सोसायटीमधील बंद फ्लॅटचा दरवाजा तोडून चोरट्यांनी फ्लॅट मधील कपाटात ठेवलेले 47 ग्रॅम सोन्याचे दागिने, वीस हजार रुपयांची रोख रक्कम असा सुमारे पाच लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. चोरीची ही घटना आज (दि. 12) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. चोरीच्या या घटनेची सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले असून दुचाकी वरून आलेल्या दोन चोरट्यांनी ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी नवनाथ नलावडे यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मात्र पोलीस स्टेशनच्या सर्व्हरला प्रॉब्लेम असल्याने फिर्याद दाखल झाली नाही. पोलिसांनीफिर्याद दाखल करण्यासाठी नंतर येण्यास सांगितले आहे सांगितले. अशी माहिती निखिल नलावडे यांनी दिली. नवनाथ नलावडे हे साईनाथ सोसायटी मध्ये राहतात. फ्लॅटला कुलूप लावून शनिवारी ते गावी धोलवड येथे गेले होते. आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी बंद फ्लॅटचा दरवाजा तोडून कपाटातील मंगळसूत्र,चैन, कानातील वेल, टॉप आदी 47 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व वीस हजार रुपयांची रोकड चोरून नेली. चोरी झाल्याची माहिती आज सकाळी नलावडे यांना समजली त्यानंतर ते धोलवड येथून नारायणगाव येथे आले. नारायणगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर सर्व्हर डाऊन झाला आहे. नंतर या असे त्यांना सांगण्यात आले. याच सोसायटीमधील निलेश नलावडे व कुबेर सोसायटीमधील नरेश पारवे यांचा असे दोन बंद फ्लॅटचा दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला.मात्र या फ्लॅटमध्ये कोणी राहण्यास नसल्याने चोरट्यांचा प्लॅन फसला.दरम्यान आनंदवाडी येथील उज्वला पाटोळे या पादचारी महिलेच्या गळ्यातील 14 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र शनिवारी सकाळी साडेदहा वाजता मोटरसायकल आलेल्या आज्ञात चोरट्यांनी लांबवले. याप्रकरणी पाटोळे यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान काही महिन्यापूर्वी वारुळवाडीच्या हद्दीमध्ये पोलीस कर्मचाऱ्या च्या घरीच दिवसाढवळ्या चोरी झाली होती. यावेळी चोरट्यांनी पोलिसाच्या घरातील सोन्याचे दागिने लंपास केले होते.या चोरीचा देखील अद्याप तपास लागला नाही. सध्या नारायणगाव परिसरामध्ये भुरट्या चोऱ्या वाढू लागले असून गृह सोसायटीत राहणाऱ्यांनी सतर्क रहावे असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपागे यांनी सांगितले.