नारायणगाव : ( प्रतिनिधी) विलेपार्ले पूर्व मुंबई येथील जैन समाजाचे जुने असलेले मंदिर मुंबई महानगरपालिकेने उद्ध्वस्त केल्याने या घटनेचा निषेध करून दोषी अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून निलंबित करावे व जैन मंदिर पुन्हा उभारावे अशी मागणी नारायणगाव जैन संघाने राज्य सरकारकडे केली आहे .
नारायणगाव जैन संघाने या घटनेचे निवेदन नारायणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी जगदीश पाटील यांना दिले आहे . यावेळी नारायणगाव जैन संघाचे सर्व ट्रस्टी ,जैन सकल संघाचे पदाधिकारी ,जैन सोशल क्लब चे पदाधिकारी व जैन बांधव उपस्थित होते . या निवेदनात मुंबई महानगर पालिकेच्या हद्दीती असणाऱ्या विले पार्ले मधील जैन समाजाचे जुने असलेले मंदिर महानगरपालिकेने बुलडोझर लावून उद्ध्वस्त केल्याने या घटनेचा नारायणगाव जैन संघाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे. विलेपार्ले येथील जैन मंदिर उध्वस्त केल्याने देशभरात सह महाराष्ट्रातील जैन समाजात संतापची लाट उसळली आहे . जैन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत . याचे तीव्र पडसाद समस्त जैन व अहिंसा प्रेमी समाजात उमटले आहे . जैन तीर्थंकर हे जगा आणि जगू द्या या संदेशाचे नायक आहेत. त्यांच्या उपदेशाने देशात शांती व अहिंसेचा महामार्ग प्रशस्त झाला आहे. स्वातंत्र्य व लोकशाहीचे रक्षण करणाऱ्या तीर्थंकर भगवान यांचे मंदिर उध्वस्त करून महानगरपालिका प्रशासनाने संविधानाने दिलेल्या उपासनेच्या जैन समाजाच्या हक्कावर गदा आणणे हे शासनास व महानगरपालिकेच्या प्रशासनाचा अशोभनीय आहे. त्यामुळे नारायणगाव जैन संघाच्या वतीने जैन मंदिर होते त्याच ठिकाणी पूर्वत महानगरपालिकेने बांधून द्यावे व या मंदिर प्रकरणी असणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना निलंबित करावे अशी मागणी आम्ही जैन समाजाच्या वतीने गृह विभागाच्या मार्फत राज्य शासनाकडे करीत आहोत.अशी माहिती संघाचे अध्यक्ष विलास भळगट ,अतुल कांकरिया यांनी दिली .
