नारायणगाव : नारायणगावच्या तरकारी मार्केटमध्ये भाजीपाल्याचे आवक कमी झाल्याने बाजार भाव वाढल्याचे दिसून येत आहे. सध्या हिवाळा असल्यामुळे सर्वच भाजीपाला आवक मंदावली आहे. त्यामुळे बाजारभाव वाढले आहेत. सध्या गवारीचा बाजारभाव अधिक सवडला असून 120 ते 125 रुपये किलोने विक्री झाली. फ्लॉवर, कोबी, वटाणा,मिरची, गवार,चवळी, दोडका, वांगी,भेंडी, काकडी, तोंडली, गाजर, पापडी, फरशी या सगळ्याचे बाजार वाढले आहेत. शेवग्याच्या शेंगांची आवक कमी झाली असून त्याचे देखील बाजारभाव तेजित असल्याचे दिसून येत आहे शुक्रवारी नारायणगावचे तरकारी मार्केटमध्ये फ्लॉवर कोबीला जास्त मागणी असल्याचे दिसून आले. तसेच सगळ्याच भाजीपाल्याचे आवक घटली आहे. काळी मिरची पन्नास रुपये विक्री झाली. फ्लॉवर २५ रुपये किलोने विक्री झाली. तसेच कोबी बावीस रुपये किलोने विकी झाली. चवळी पस्तीस रुपये किलो,आले तीस रुपये, गवार एकशे वीस रुपये किलो, घेवडा पंचेचाळीस रुपये किलो, पावटा पन्नास रुपये किलो, अघोरी वांगी पस्तीस रुपये किलो,कच्ची केळी चार रुपये किलो, पपई चार रुपये किलो, काकडी तीस रुपये किलो, ढोबळी मिरची सत्तर रुपये किलो, तोंडली पन्नास रुपये किलो, मका बाजारामध्ये फारशी आवक नव्हती तरी देखील पंधरा रुपये किलोने विक्री झाली. कारल्याची आवक अत्यल्प असून साठ रुपये किलोने विक्री झाली. गावठी गाजराची वीस रुपये किलो विक्री झाली. सध्या वाटण्याची आवक कमी आहे तो देखील 80 रुपये किलोने विकला गेला. तुरीच्या शेंगा 60 रुपये किलोने विक्री झाली. दरम्यान सध्या थंडी असल्यामुळे सगळ्यात तरकारी भाजीपाल्याची अवघडलेली आहे त्यामुळे बाजार भाव देखील तेजीत असल्याचे व्यापारी सचिन बेलवटे व विनोद शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले या दिवशी दरवर्षी तरकारी भाजीपाल्याची आवक कमी होत असते. आणि म्हणून बाजारभाव देखील तेजीत असतात. शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात केलेल्या तरकारी भाजीपाल्याची वेळची वेळी काळजी घ्यावी व माल निवडून आणावा जेणेकरून चार पैसे त्याचे चार पैसे अधिकचे होतील.