सैन्य दलाने “ऑपरेशन सिंदूर” यशस्वी केल्याबद्दल त्यांच्या पाठिंब्यासाठी नारायणगाव येथे रविवारी रॅलीचे आयोजन.


नारायणगाव: ( प्रतिनिधी) आपल्या सैन्यदलांनी भीमपराक्रम करून “ऑपरेशन सिन्दुर” द्वारे पाकिस्तानला जेरीस आणले आहे. आपल्या तिन्ही सैन्यदलांना आपला पाठिंबा दर्शविण्यासाठी आणि भविष्यातही होणाऱ्या कारवाईसाठी त्यांच्यामागे आपण भक्कमपणे उभे आहोत हे दर्शवण्यासाठी नारायणगाव येथे रविवार (दि. १८) रोजी सकाळी ९ वाजता “तिरंगा रॅली “आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती नारायणगावचे माजी उपसरपंच आशिष माळवदकर यांनी दिली. सैन्य दलाला पाठिंबा देण्यासाठी नारायणगाव येथून ही रॅली ही रॅली मुक्ताबाई मंदिरापासून सुरू होऊन,श्री हनुमान मंदिरमार्गे ST स्टँड पर्यंत जाईल आणि समारोप होईल. ही रॅली म्हणजे आपल्यासाठी आपल्या राष्ट्राची केलेली मोठी सेवाच ठरेल.सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी आपण इतके नक्कीच करू शकतो. नारायणगाव परिसरातील नागरिकांनी आपल्या मित्रपरिवारासह वेळ काढून या रॅलीत सामील व्हावे असे आवाहन आशिष माळवदकर यांनी केले आहे.

जाहिरात

error: Content is protected !!