विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा
सामान्य जनतेसाठी सतत लढणारी ती म्हणजे शिवसेना. शिवसेना पक्ष फुटला दोन वेगवेगळे गट तयार होऊन एकनाथ शिंदे यांची शिवसेना तर दुसरी उद्धव ठाकरे यांची शिवसेना. एकनाथ शिंदे या शिवसेनेचे जुन्नर तालुकाप्रमुख बाबू पाटे तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला तालुकाप्रमुखच मिळेना. वेगवेगळ्या नावाची चर्चा होत असते परंतु अधिकृत घोषणा काही होईना. पक्षाचे नेते सचिन आहेर याबाबतची घोषणा लवकरच करणार अशी चर्चा होत होती. परंतु माऊली खंडागळे यांनी मशाल खाली ठेवून हातात धनुष्यबाण घेऊन बरेच दिवस लोटले तरी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला तालुकाप्रमुख काही मिळत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भास्कर गाडगे यांच्या नावाची चर्चा होत होती. निवडून आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा गाडगे यांनी सत्कारही केला त्याच वेळी वाटत होते की गाडगे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे तालुकाप्रमुख होणार. परंतु अद्याप ना त्यांच्या नावाला पक्षप्रमुख परवानगी देईना ना दुसरा कोणी कार्यक्षम तालुकाप्रमुख निवडला जाईना. पक्ष नेतृत्वाने जर निर्णय लवकर घेतला नाही तर संघटना वाढणार कशी व जे कार्यकर्ते आहेत त्यांना बळ कसं मिळणार? आगामी काळात मोठ्या कोणत्याच निवडणुका नसल्या तरी ग्रामपंचायतीच्या निवडणुका निश्चित आहेत या निवडणुकीत कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी पक्षाचा तालुकाप्रमुख हा महत्त्वाचा असतो. पक्षाच्या चिन्हावर जरी निवडणूक लढवल्या जात नसल्या तरी कार्यकर्त्यांना साथ देण्यासाठी पक्ष नेतृत्व तालुकास्तरावर कणखर असावे लागते. एकनाथ शिंदे यांचे तालुकाप्रमुख बाबू पाटे यांना जनता आमदार म्हणून म्हणत असते. त्यांच्या नशिबात असेल तर ते आमदार देखील होऊ शकतात. सध्या ते तालुकाप्रमुख असल्यामुळे त्यांनी तालुक्यात संघटना वाढीकडे लक्ष देण्याची गरज आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने लवकर तालुकाप्रमुख नियुक्त करून आहे ती पक्षाची संघटना मजबूत ठेवण्याची आवश्यकता आहे.