पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह शिक्षण अधिकारी संजय नाईकडे व गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले साहेब आणि गटविकास अधिकारी खेड व जिल्हा परिषदेचे इतर अधिकारी
यांनी जालिंदरनगर शाळेला दिली भेट. यावेळी शाळेमध्ये चालू असलेले भविष्यवेधी शिक्षण आणि विविध उपक्रमांबद्दल अधिकाऱ्यांनी माहिती जाणून घेतली व शाळेतील विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक केले.
जालिंदर नगर शाळेस पाठबळ देण्यासोबतच या शाळेसारख्या अनेक शाळा संपूर्ण जिल्ह्यात कशा तयार होतील यावरही सामूहिकपणे काम करण्याबाबत नियोजन केले गेले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री संदीप म्हसुडगे,राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक श्री दत्तात्रय वारे गुरुजी व ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून पारंपारिक शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व कल्पकतेला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध कलाकृतींची, प्रकल्पांची पाहणी करून गजानन पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.