पिंपळगाव विकास सोसायटीची 86 वी वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न. विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर.


नारायणगाव : (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथील विकास सोसायटीची 86 वार्षिक सभा केळीमुळीच्या वातावरणात पार पडली. विषय पत्रिकेवर असलेल्या सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय खांडगे यांच्या अध्यक्षतेखाली ही वार्षिक सभा संपन्न झाली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रशांत चव्हाण ज्येष्ठ संचालक राजेश खांडगे, संजय वाणी,मारुती जेडगुले, सुरेखा गावडे, मनीषा खांडगे, रोहिदास वऱ्हाडी, उत्तम वऱ्हाडी,राकेश चव्हाण, गंगाराम लोखंडे,तसेच श्रीकृष्ण पतसंस्थेचे अध्यक्ष नंदकुमार खांडगे, उपाध्यक्ष बाळासाहेब वाणी पिंपळगावच्या सरपंच माधुरी वऱ्हाडी, श्रीराम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश वऱ्हाडी माजी अध्यक्ष राजेश गावडे, माजी सरपंच अरुण वऱ्हाडी, विलास वऱ्हाडी, एकनाथ वाणी, जीवन वऱ्हाडी, तंटामुक्त समिती अध्यक्ष अनंतराव खांडगे, मदन वऱ्हाडी, जयेश खांडगे आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे सचिव प्रसाद राऊत यांनी अहवाल वाचन केले. तसेच सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे अध्यक्ष दत्तात्रय खांडगे व ज्येष्ठ संचालक राजेश खांडगे यांनी उत्तरे दिली. चर्चेमध्ये श्रीकृष्ण पतसंस्थेचे अध्यक्ष नंदकुमार खांडगे माजी अध्यक्ष राजेश गावडे एकनाथ वाणी,विलास वऱ्हाडी, प्रमोद खांडगे, जीवन वऱ्हाडी, आनंतराव खांडगे आदींनी सहभाग घेतला. यावेळी बोलताना श्रीराम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश वऱ्हाडी म्हणाले की, सोसायटीचा कारभार चांगला व पारदर्शक असल्याने सभासदांना लाभांश देखील चांगला देण्यात आला आहे कर्जदार सभासदांनी कर्जाचा भरणा वेळेत करावा की जेणेकरून लाभांश अधिकाधिक मिळू शकेल. सोसायटीच्या कर्मचाऱ्यांचे कामकाज चांगला असल्याचा उल्लेख श्रीकृष्ण पतसंस्थेचे अध्यक्ष नंदकुमार खांडगे यांनी केला. यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय खांडगे म्हणाले की, संस्थेचे ही 86 व वार्षिक सभा असून संचालक मंडळाचा एकोपा असल्याने सभासदांच्या हिताचा निर्णय आम्ही आजवर घेत आलेलो आहे व भविष्यकाळात देखील सभासदांच्या हिताचा निर्णय वेळोवेळी घेतला जाईल. संस्थेच्या सभासदांचे हित जपणे हे आमचे कर्तव्य आहे. संस्थेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय पुंडलिक खांडगे यांच्या मार्गदर्शक धोरणानुसार संस्थेचा कारभार अधिकाधिक सभासद हिताचा करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. वार्षिक सभेचे सूत्रसंचालन सचिव प्रसाद राऊत व ज्येष्ठ संचालक राजेश खांडगे यांनी केले तर उपस्थितांचे आभार संचालक राकेश चव्हाण यांनी मानले.

जाहिरात

error: Content is protected !!