नारायणगाव : (प्रतिनिधी) नारायणगाव येथील व्यापरी पराग अशोक कुमार शहा याला ठाणे जिल्ह्यातील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी मंगळवारी (दि. 3) रात्री उशिरा नारायणगावच्या त्याच्या राहत्या घरी ताब्यात घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान ठाणे न्यायालयात त्याला हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची सूत्रांनी माहिती दिली. दरम्यान या घटनेमुळे नारायणगाव परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान गुगलच्या माध्यमातून बनावट ॲप तयार करून ज्यादा परतावा देण्याच्या आमिषाने अनेकांची फसवणूक केल्याची परिसरात चर्चा होत आहे. दरम्यान यात सुमारे दोन हजार कोटींचा हवाला घोटाळा असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी विधान परिषदेमध्ये केला होता. दरम्यान पराग शहा यांनी जुन्नर तालुक्यातील अनेक लोकांकडून पैसे गोळा करून ” क्यु फोल ऍप” जाहिरात कंपनीत गुंतवले असल्याची माहिती समोर येत असून यामध्ये अनेक राजकीय बडे नेते असल्याची चर्चा आहे.पराग शहा याने आ. शरद सोनवणे हे माझ्याकडे खंडणीमागत असल्याची ऑनलाईन तक्रारी अर्ज त्याने होता. परंतु त्या संदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी पराग शहा कोणत्याही पोलीस स्टेशनला गेला नव्हता. दरम्यान जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांचे देखील पराग शहाकडे तीन कोटी रुपये गुंतवले असल्याचे त्यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सांगितले होते. शहा याने जुन्नर तालुक्यातील अनेक गोरगरीब जनतेचे पैसे या ऍप मध्ये गुंतवले असून हे सगळे पैसे परत मिळवून देण्यासाठी माझा प्रयत्न राहील असेही सोनवणे यांनी त्यावेळी मुलाखतीत सांगितले होते. दरम्यान पराग शहा याला ठाणे जिल्ह्यातील आर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्यामुळे जुन्नर तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. ज्या लोकांनी यामध्ये पैसे गुंतवले आहेत, त्यांचे आता पैसे परत मिळणार का? यात काही बडे मासे आहेत का? याबाबत उलट सुलट चर्चा होत आहे.