नारायणगाव : ( प्रतिनिधी ) श्रींच्या अष्टविनायकातील मुख्य स्थान श्रीक्षेत्र ओझर येथे भाद्रपद गणेश जयंतीनिमित्त गेली पाच दिवस सुरु जन्मोत्सव सोहळ्याची सांगता लाल माती वरील कुस्त्यांच्या भव्य आखाड्याने झाली. कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांची पारणे फेडतील अशा नामवंत मल्लांनी कुस्त्या देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष बाळकृष्ण कवडेयांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली सर्व विश्वस्त मंडळाच्या सहभागाने संपन्न झाल्या. विशेष म्हणजे श्री क्षेत्रओझर येथे महिलांच्या देखील कुस्त्या झाल्या. पुणे, सोलापूर, नगर, मुंबई, सातारा जिल्ह्यांतील नामवंत
मल्लांनी या आखाड्यास हजेरी लावली. ओझर आणि परिसरातील शिरोली बुद्रुक खुर्द, तेजेवाडी, धालेवाडी, हिवरे बुद्रुक, खुर्द आदी पंचक्रोशीतील गावातील कुस्तीप्रेमींनी मोठ्या प्रमाणात आखाड्यास गर्दी केली होती.आखाड्याचे लिलावदार माजी विद्यार्थी संघटना श्री क्षेत्र ओझर रक्कम , रु.१,५५,५५५/- पागोट्याचे लिलावदार श्री २००७ एस.एस.सी.ब्यच रक्कम रुपये ७७,७७७/- व पानसुपारीचे लिलावदार श्री विलास सोनू कवडे रक्कम रुपये ५५०००/- दिल्याबद्दल या सर्वांचा जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच ट्रस्ट च्या वतीने सर्व लिलावदार यांची ओपन जिप मधून ढोल तश्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.आखाड्यात पंच लक्ष्मण टेंभेकर, किशोर कवडे, गणेश राऊत सर, मंगेश मांडे, शहाजी रवळे, विनायक मांडे,पोलीस पाटील मोहन रवळे , गणपत कवडे यांनी काम पहिले. याप्रसंगी मा.आमदार अतुल बेनके मा. अध्यक्ष गणेश कवडे, उपाध्यक्ष अजित कवडे, देवस्थान ट्रस्ट चे माजी अध्यक्ष शाकुजी कवडे, ग्राविकास अध्यक्ष संतोष मांडे, निलेश टेंभेकर, मा. विश्वस्त आनंदराव मांडे, रंगनाथ रवळे, गणपत कवडे, हिवरे गावचे आदर्श सरपंच निलेश बेनके यांची उपस्थिती होती. शेवटची कुस्ती सर्वमान्यवरांच्या हस्ते व देवस्थान ट्रस्ट चे सर्व विश्वस्त यांच्या हस्ते लावण्यात आली. समालोचन म्हणून विश्वस्त सुर्यकांत रवळे, मा. विश्वस्त कैलास मांडे यांनी काम पहिले. यात्रा उत्सवाचे नियोजन विघ्नहर गणपती ट्रस्ट आणि ग्रामविकास संस्था ओझर यांनी केलेअध्यक्ष बाळकृष्ण कवडे, उपाध्यक्ष तुषारकवडे, सचिव सुनिल घेगडे, खजिनदार दत्तात्रय कवडे, विश्वस्त प्रकाश मांडे, सुर्यकांत रवळे, गोविंद कवडे, विक्रम कवडे, समीर मांडे, विनायक मांडे, संतोष कवडे, विलास कवडे, मंगेश पोखरकर, विनायक जाधव, सौ. शिल्पा जगदाळे, देवस्थानचे व्यवस्थापक, कर्मचारी वर्ग ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले. यात्रेची सांगता रात्री ९ वा.”मनोरंजनाचा कार्यक्रम महाराष्ट्राची गौरवगाथा “लोकनृत्याचा ५५ कलाकारांच्या संचातील अनोखा मनोरंजनाचा उदय साठम यांचा कार्यक्रम विघ्नहर सांस्कृतिक भवन मध्ये संपन्न झाला.