नारायणगाव :(प्रतिनिधी )अष्टविनायकांतील मुख्य स्थान असलेल्या श्री क्षेत्र ओझर येथे पहाटे ५ वाजता श्री विघ्नहर मंदिरात पूजा करून दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. देवस्थान ट्रस्ट ने विनायकी चतुर्थी व शारदीय नवरात्री निमित्त”दुर्गा नवचंडी यागाचे आयोजन केले होते . श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष बाळासाहेब कवडे व विश्वस्त मंडळ यांच्या नियोजनाखाली दुर्गा नवचंडी याग संपन्न झाला. सकाळी ७.०० वा. आरती संपन्न झाल्यानंतर ठीक ८ वा.नवचंडी यागाचे पूजन करून यागाला गणेशपूजनाने सुरुवात झाली. यागासाठी एकूण एकवीस मान्यवर जोडपी उपस्थित होती. मान्यवर यांची राहण्याची सुविधा भक्तभवन मध्ये करण्यात आली. मान्यवरांना देवस्थान ट्रस्ट च्या महाप्रसादालयात भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. सर्व मान्यवर यांना देवस्थान ट्रस्ट च्या वतीने सोहळे परिधान करून विशेष पुरोहित यांच्या उपस्थितीत शारदीय नवरात्री निमित्त”दुर्गा नवचंडी ससंपन्न झाला. सर्व मान्यवर यांचा सत्कार देवस्थान ट्रस्ट च्या वतीने करण्यात आला. उपस्थित मान्यवर यांनी देवस्थान ट्रस्ट चे विशेष आभार मानले व देवस्थान ट्रस्ट ने भाविकांना उपलव्ध केलेल्या सुखसोई यांचे विशेष कौतुक केले. या प्रसंगी देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष बाळासाहेब कवडे ,उपाध्यक्ष तुषार कवडे, खजिनदार दत्तात्रय कवडे,विश्वस्त, प्रकाश मांडे, विनायक मांडे , संतोष कवडे , विलास कवडे ,सौ.शिल्पा जगदाळे, यांनी केले.