नारायणगाव : (प्रतिनिधी) येथील ग्रामोन्नती मंडळ संचलित गुरुवर्य रा.प. सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचा सरासरी निकाल 93.02 टक्के लागला. परीक्षा दिलेल्या 975 विद्यार्थ्यांपैकी 907 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. साहिल ओव्हळ, तेजस हांडे या विद्यार्थ्यांनी माहिती तंत्रज्ञान विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले. यश श्रीकांत फुलसुंदर, मनस्वी डोके, अमानत मुलाणी, यशराज डुंबरे या विद्यार्थ्यांनी माहिती व तंत्रज्ञान या विषयात 99 गुण मिळवले.बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयात संस्कार हांडे,सायमन भद्रिके या विद्यार्थ्यांनी 100 पैकी 99 गुण मिळवले.विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा यावर्षी सुद्धा विद्यार्थ्यांनी पुढे सुरु ठेवली.अशी माहिती मुख्याध्यापिका सुषमा वाळिंबे, उपप्राचार्य हनुमंत काळे यांनी दिली.
यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचा सत्कार ग्रामोन्नत्ती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर,अध्यक्ष सुजित खैरे, विश्वस्त मोनिका मेहेर,प्रकाश पाटे,कार्यवाह रविंद्र पारगावकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मंडळाचे संचालक, मुख्याध्यापिका सुषमा वाळिंबे,उपप्राचार्य हनुमंत काळे, पर्यवेक्षक अनुपमा पाटे,पर्यवेक्षक संजय वलटे आदी उपस्थित होते.
@शाखा निहाय सरासरी निकाल व अनुक्रमे प्रथम तीन विद्यार्थी( कंसात मिळालेले गुण टक्के ) : विज्ञान शाखा सरासरी निकाल: 99.82 टक्के.
अर्पिता हांडे( 93 टक्के ), यश फुलसुंदर (91.17 टक्के ), जुबेदा खान (85.33 टक्के ),
@वाणिज्य शाखा सरासरी निकाल : 91.54 टक्के.
तेजस विजय हांडे (95.17 टक्के ), संस्कार हांडे
( ९३.३३ टक्के ), सायमन भद्रिके (91.67 टक्के).
@ कला शाखा सरासरी निकाल : 59.59 टक्के
सेजल चानोदिया(80.67 टक्के),रंजित मोहिते(80.50 टक्के),सायली भंडलकर(71.83 टक्के)
@ व्यावसायिक विभाग सरासरी निकाल 80.64 टक्के.
निलेश रवींद्र सोनवणे(68.17 टक्के), यश वऱ्हाडी, किरण गुप्ता (62.83 टक्के), यश चकटे(62.33 टक्के )