नारायणगावात श्री साईबाबांच्या पादुकांचा दर्शन सोहळा उत्साहात, रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन.किरण वाजगे यांचे ५५ व्या वेळी रक्तदान.

विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा नारायणगाव (ता.जुन्नर) येथील श्रीक्षेत्र मुक्ताबाई देवी समाज मंदिर सभागृहात आज( दि . ९ ) श्री साईबाबांच्या खऱ्याखुऱ्या पादुका दर्शन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दर्शन सोहळा सुरू होण्यापूर्वी नारायणगाव बस स्थानकापासून श्री मुक्ताबाई मंदिरापर्यंत फुलांची उधळण करत वाजत गाजत पालखीमध्ये श्री साईबाबांच्या पादुका आणण्यात आल्या. याप्रसंगी आरोग्य शिबिर तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने शेकडो साई भक्तांनी तसेच इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान केले व आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. या रक्तदान शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक महिला भगिनींनी या रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान केले. तसेच येथील पत्रकार किरण वाजगे यांनी ५५ व्या वेळी रक्तदान केले.
दरम्यान येथील श्री मुक्ताबाई समाज मंदिरात साईबाबा यांच्या तत्कालीन साकार स्वरूपातील खऱ्याखूऱ्या पादुका दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. या पादुकांचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले.

जाहिरात

error: Content is protected !!