नारायणगाव : दवाखान्यात निघालेल्या सपना विलास बेंद्रे (वय 45, राहणार संस्कृती अपार्टमेंट, साने वस्ती,वारूळवाडी ) या पादचारी महिलेच्या गळ्यातील
सुमारे अडीच तोळे वजनाचे मंगळसूत्र मोटरसायकलवर आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी हिसका मारून पळवले.
ही घटना आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास येथील कॉलेज – साने वस्ती रस्त्यावर झाली.
सपना बेंद्रे या भाची समावेत येथील कॉलेज रोड ने
नारायणगाव येथे दवाखान्यात जाण्यासाठी निघाल्या होत्या. दरम्यान दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाच्या मागील बाजूच्या रस्त्यावर आले असता पल्सर मोटरसायकलवर आलेल्या तीन जणां पैकी एकाने गळ्यातील मंगळसूत्र हीसका मारून पळवून नेले. त्यानंतर चोरटे पुणे नाशिक महामार्गाच्या रस्त्याने पळून गेले. याबाबतची तक्रार विलास बेंद्रे यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.