नारायणगाव ( प्रतिनिधी)
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्ताने एकता दिवस ( RUN FOR UNITY ) निमित्ताने नारायणगाव येथे शुक्रवार (दि. 31) रोजी सकाळी 07:15 ते 08:30 या दरम्यान नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत 2 कि.मी. मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते, अशी साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपागे यांनी दिली. या मॅरेथॉनमध्ये पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी, डॉक्टर्स, पोलीस पाटील, नागरिक, पत्रकार, नारायणगाव पोलीस स्टेशन स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार, पोलीस शिपाई, महिला कर्मचारी तसेच सामाजिक संघटनांचे पदाधिकारी असे मिळून 200 ते 210 स्पर्धक सहभागी झाले होते. दरम्यान स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.