नारायणगाव : ( प्रतिनिधी ) पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव या ठिकाणी असलेल्या एसटी महामंडळाच्या बस स्थानकाच्या आवारात खाजगी चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात उभी केली जात असल्याने एसटी बस आतमध्ये आणताना व बाहेर काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. खाजगी वाहने बस स्थानकाच्या आवारात उभी करू नयेत असे अनेकदा सांगून देखील संबंधित वाहनचालक ऐकत नाहीत. व पोलिसांना पत्र देऊन देखील त्यांच्याकडूनही कोणते सहकार्य मिळत नसल्याचे आगार प्रमुख वसंत आरगडे यांचे म्हणणे आहे. नारायणगाव बस स्थानकाचे आवारामध्ये खाजगी दुचाकी पे पार्किंग करण्यात आले आहे. परंतु लोक या ठिकाणी वाहन पार्क न करता बस स्थानकाच्या दोन्ही बाजूने मोकळ्या जागेत दुचाकी वाहने उभी करत असतात तसेच चारचाकी वाहनेही बस स्थानकाच्या दोन्ही बाजूने उभी करीत आहेत.त्यामुळे एसटी बस आत येताना तो बाहेर जाताना बस चालकाला कसरत करून बस बाहेर काढावी लागते. अनेकदा एसटी महामंडळाचे कर्मचारी उभे करून बस स्थानकाच्या आत मध्ये व बाहेर काढावी लागते. खाजगी वाहनाला एसटी बस घासून अपघात होण्याचे देखील भीती असते. नारायणगाव ही मोठी बाजारपेठ असल्याने खरेदीसाठी आलेल्या लोकांची सरसकट चार चाकी वाहने बस स्थानकाचे आवारात उभी केले जातात. पर्यायी खाजगी वाहन पार्किंग असताना देखील लोक तिकडे वाहन पार करता बस स्थानकाच्या आवारातच खाजगी वाहन उभे करणे वसंत करीत असतात व त्याचा मनस्ताप एसटी महामंडळाला एसटी आत घेताना व बाहेर काढताना होत असतो. बस स्थानकाच्या दर्शनी बाजूला मोठमोठे फ्लेक्स लावले जात असल्यामुळे परिसराचे विद्रूपीकरण होत असून एसटी महामंडळाचा दर्शनी भागाचा फलक देखील त्यामुळे झाकून जात आहे. तसेच प्रवाशांना देखील दर्शनी भागातून बस स्थानकाच्या आवारामध्ये येता येत नाही अनेकदा या मार्गावरच खाजगी व्यवसाय करणाऱ्या रिक्षा उभ्या केल्या जातात. बस स्थानकाच्या दर्शनी बाजूला मोठमोठे फ्लेक्स लावल्याने बस स्थानकाचा दर्शनी भाग झाकून जात असून संबंधित विभागाने बेकायदेशीर प्लेट लावण्यावर कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. प्रवाशांना या बस स्थानकाच्या दर्शनी भागातून बस स्थानकाच्या आवारात प्रवेश करता येत नाही पायऱ्यांवरच खाजगी रिक्षा उभ्या केल्या जातात व दर्शनी भागामध्ये मोठे मोठे फ्लेक्स लावले जात असल्याने बस स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना एसटीच्या मार्गाने आत येते व ज्या मार्गाने बाहेर पडते त्याच मार्गाचा अवलंब करावा लागतो व त्यामुळे एसटी बाहेर पडताना किंवा आत येताना अपघात होण्याची भीती प्रवाशांना वाटत असते. दरम्यान या संदर्भात बस स्थानकाचे आभार प्रमुख वसंत आरगडे यांच्याशी भ्रमणधुरी वरून संपर्क साधला असता ते म्हणाले की सध्या दिवाळी असल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी बस स्थानकात होत असते. बस स्थानकाच्या आवारात खाजगी वाहने पार्क केली जात असल्यामुळे एसटी बसेस आत घेताना व बाहेर काढताना बस चालकांना खूप त्रास होत असतो अनेकदा कर्मचाऱ्यांना उभे राहून बस आत किंवा बाहेर घ्यावी लागते. अनेकदा वाहनचालकांना या ठिकाणी खाजगी चार चाकी वाहने उभी करू नका असे सांगून देखील कोणी ऐकत नाही एखाद्या वाहनावर कारवाई केली तर राजकीय पुढार्यांचा फोन करून दबाव येतो. तसेच पोलिसांना देखील पत्र दिलेले आहे परंतु त्यांच्याकडूनही अद्याप कोणतेच सहकार्य मिळत नाही. बस स्थानकाच्या आवारामध्ये दुचाकी ते पार्किंग आहे. परंतु लोक त्या ठिकाणी दुचाकी वाहन पार करण्याच्या ऐवजी मोकळ्या जागेतच दुचाकी वाहने उभी करतात.