नारायणगावात फ्लॅट फोडून 20 तोळे सोने व 60 हजार रुपये चोरट्याने केले लंपास.


नारायणगाव : (प्रतिनिधी) नारायणगाव येथील कोऱ्हाळे विटे मळ्यातील वैभव रेसिडेन्सी या सोसायटीमधील फ्लॅटच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील सुमारे 20 तोळे सोन्याचे दागिने, 250 ग्रॅम चांदीचे दागिने, साठ हजार रुपये रोख असा एकूण वीस लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. दरम्यान दोन दिवसापूर्वी वारुळवाडी येथे बंद फ्लॅट फोडून पाच लाख रुपये किमतीचे दागिने चोरी गेले आहेत. नारायणगाव परिसरामध्ये चोऱ्यांचे सत्र वाढू लागल्याने जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांनी दिली. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, विष्णू भागुजी सांगडे हे खोडद रस्त्यालगत असलेल्या वैभव रेसिडेन्सी सोसायटी मध्ये कुटुंबासमवेत राहत आहेत. आज (दि. 14) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास फ्लॅटच्या दरवाज्याला कुलूप लावून विष्णू सांगडे व त्यांच्या पत्नी हे दोघे मुक्ताबाई देवी मंदिरात काकड आरती साठी गेले होते. यावेळी फ्लॅटमधील बेडरूम मध्ये मुलगा सून व पुतण्या झोपले होते. दरम्यान साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी फ्लॅटचा कडी कोयंडा गॅस कटरने तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला. फ्लॅट मधील कपाटाचे कुलूप तोडून डब्यात ठेवलेले पंधरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, 25 तोळे चांदीचे दागिने व रोख साठ हजार रुपये रोख असा एकूण 20 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.घटनास्थळी सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील,नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपागे यांनी भेट देऊन पाहणी केली.त्या नंतर सायंकाळी गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी पथकासह भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेची पाहणी केली.तसेच ठसे तज्ञ व श्वानपथक यांनाही पाचारण करण्यात आले होते.अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संपगे यांनी दिली. दरम्यान ग्रामीण भागामध्ये मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढू लागल्यामुळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एवढे दागिने संबंधित व्यक्तीने घरात ठेवल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे

दरम्यान विष्णू भागुजी शिंगाडे यांनी मंचर येथे राहत असलेल्या बहीनीला घर घेण्यासाठी हे दागिने दिले होते. बहिणीने हे दागिने बँकेत ठेवून घरासाठी पैसे उपलब्ध केले होते. पैशाची उपलब्धता झाल्यावर बहिणीने भावाचे दागिने बँकेतून सोडून दोन दिवसांपूर्वी नारायणगाव येथे सुपूर्द केले होते. शिंगाडे यांनी हे दागिने जर बँकेत ठेवले असते तर कदाचित अशी वेळ आली नसती.

जाहिरात

error: Content is protected !!