नगदवाडी येथे माजी सरपंच बाळासाहेब बढे यांच्या पुढाकाराणे 51 सायकलीचे वितरण.

नारायणगाव:- (प्रतिनिधी ) नगदवाडी (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या सायकल बँक उपक्रमांतर्गत ५१सायकलचे वितरण बुधवारी (दि.१७) रोजी जुन्नर चे गटविकास अधिकारी प्रतीक चन्नावार, गटशिक्षणाधिकारी अशोक लांडे, कृषी विस्तार अधिकारी झांजे ,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार, गणपतराव फुलवडे ,कांदळी गावचे माजी आदर्श सरपंच बाळासाहेब बढे ,खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अशोक बढे,सरपंच डॉ.पल्लवी भोर, उपसरपंच विशाल रेपाळे ,अनिल भोर, , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश बढे,शाळा सल्लागार समितीचे अध्यक्ष सुरेश बढे, तान्हाजी बढे,दिनेश कुतळ, विश्वास बढे, शिवशंकर मांडे,ग्रामपंचायत सदस्य निलेश बढे ,कृष्णा बढे ,ऋषिकेश भोर , नंदा बढे, महेश बढे ,संगीता बढे, ,दयानंद बढे, रवींद्र काळे, रघुनाथ बढे, ग्रामविकास अधिकारी रंजना रघतवान , केंद्रप्रमुख वनिता हांडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
यावेळी बोलताना गटविकास अधिकारी प्रतिक चन्नावार, म्हणाले की, नगदवाडीतील दानशूर ग्रामस्थांनी माजी सरपंच बाळासाहेब बढे यांच्या पुढाकाराने अतिशय चांगला उपक्रम राबविला आहे यामुळे विद्यार्थिनींचा प्रवास सुखकर होईल. लहान मुलांना जाणे येणे सोयीचे होईल पर्यावरण व आरोग्याच्या दृष्टीने सायकल ही हितकारक असून ग्रामस्थांनी ५१ सायकलला दिलेले योगदान महत्वपूर्ण आहे. यावेळी मुख्याध्यापक सखाराम शेंडकर, गटशिक्षणाधिकारी अमोल लांडे ,गटविकास अधिकारी प्रतिक चन्नावार,पांडुरंग पवार गणपतराव फुलवडे यांनी मनोगत व्यक्त केले .डॉ. दीपक घाडगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर कांदळी गावचे माजी आदर्श सरपंच बाळासाहेब बढे यांनी उपस्थितांचे व सायकल साठी योगदान दिलेल्या दानशूर ग्रामस्थांचे आभार मानले.

जाहिरात

error: Content is protected !!