नारायणगाव : ( प्रतिनिधी ) खामगावच्या शिवेचीवाडी येथील आदिवासी ठाकर समाजातील स्व.आदित्य सुरेश काळे हा २१ वर्षीय तरुण सहकाऱ्याचे अपघात झाल्या नंतर त्याच्या कुटुंबाच्या भविष्यातील उदरनिर्वाहाच्या दृष्टीने सामाजिक बांधिलकी जपत या गावचे माजी उपसरपंच अजिंक्य घोलप यांनी तालुक्यातील सर्व घटकातील समाज बांधवांना मदतीचे आवाहन केले होते,त्या अनुषंगाने दत्ता गवारी,एड.ललित जोशी,किरण लोहकरे,मारुती वायाळ,डॉ.विनोद केदारी,संजय मोधे यांच्या पुढाकाराने मोठ्या प्रमाणात ऑनलाइन व रोख रक्कम स्वरूपात जी मदत जमा झाली ती सर्वच्या सर्व मदत काळे कुटुंबाकडे सुपूर्त करण्यात आली आहे. यावेळी मुक्तादेवी झांजपथकाचे अध्यक्ष हरिभाऊ केदारी,माजी सरपंच सुवर्णा जाधव,रंजना काळे,पाराजी केदारी,श्रीकृष्ण केदारी,सचिन डाके,झनकू बोऱ्हाडे,ओंकार घोलप,अमोल जाधव,कुसूम केदारी,बाळू मोधे,पप्पू मडके उपस्थित होते. स्थानिक नागरीक व जुन्नर तालुक्यातील दानशूर व्यक्तीच्या मदतीने 5 लाख 48 हजार 657 हजार रुपये या कुटुंबाला सुकृत करण्यात आले. दरम्यान अपघाताची घटना घडल्यानंतर राजकारण व जाती धर्माच्या पलीकडे जाऊन दवाखाना पोलीस स्टेशन,न्यायालय तसेच आजतागायत काळे कुटुंबाच्या सोबत उभे राहणाऱ्या सर्व समाज बांधवांचे यावेळी समन्वयक टीमने आभार व्यक्त केले.भविष्यात देखील अशी वेळ कुणावर येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर पुन्हा एकदा आपण सर्व मंडळी निश्चित प्रमाणे त्या कुटुंबाच्या पाठीमागे उभे राहण्याचा प्रयत्न करूयात अशा भावना यावेळी व्यक्त केल्या. दरम्यान खामगावच्या सरपंच नीलम घोलप म्हणाल्या की, आदित्य काळे यांचे कुटुंब अतिशय गरीब असून या कुटुंबाला कोणाचाही आधार नव्हता. आमच्या गावातील तरुण एकत्र आले व इतरांनी पुढाकार घेऊन एवढी रक्कम आम्ही उभी करू शकलो भविष्यकाळामध्ये अशी वेळ कोणावरही यायला नको. या कुटुंबाच्या पाठीशी आमचं गाव भविष्यकाळात देखील खंबीरपणे उभे राहील.