विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा
जुन्नरच्या माणिकडोह निवारा केंद्रातील वीस बिबटे शनिवारी गुजरातच्या वनतारा येथे रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 50 बिबटे वन तारा येथे हलवण्यास सरकारने यापूर्वीच अनुमती दिली आहे. यातील पहिला टप्पा म्हणून दहा नर व दहा मादी असे एकूण वीस बिबटे शनिवारी वन तारा येथे रवाना होणार आहेत.
हे बिबटे नेण्यासाठी वनताराची 25 लोकांचे टीप माणिकडोह निवारा केंद्रात दाखल झाली आहे. बिबटे नेण्यासाठी दोन मोठे वाहने तसेच चार ॲम्बुलन्स दाखल झाले आहेत. सध्या माणिक डोळे येथील निवारा केंद्र जुने 51 रुपये व नवीन 104 बिबटे असे एकूण 152 व्यक्ती आहेत. यातील वीस बिबटे शनिवारी वन तारा येथे रवाना होत असून उर्वरित 30 बिबटे देखील वनतारा येथे निवाऱ्याची सोय झाल्यावर रवाना होणार असल्याचे समजते. या 30 बिबट्यामध्ये 15 नर व 15 मादी असणार आहे.