*विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा*
जुन्नर पंचायत समितीच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी जयसिंग पोटे यांची निवड व राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी संभाजी चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.जुन्नर पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे आठ पंचायत समिती सदस्य निवडून आले आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा सदस्य निवडून आले आहेत. भाजपाचा एक व शिवसेना (उबाठा )यांचा एक सदस्य निवडून आला आहे.
दरम्यान पंचायत समितीमध्ये सभापती व उपसभापती पदांच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून राजकीय हालचालींना वेग आला आहे लवकरच सभापती पदासाठी निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जुन्नर पंचायत समितीवर शिवसेनेचा सभापती होतो की राष्ट्रवादी काँग्रेस काही डावपेच करून इतर सदस्य आपल्या जाळ्यात उडतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.