विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असून दुपारी तीन वाजेपर्यंत कोण माघारी घेणार व कोणत्या गटात रंगत येणार हे चित्र स्पष्ट होणार आहे या निवडणुकीत पुन्हा एकदा आजी आमदार विरुद्ध माजी आमदार अशीच लढत पाहिला मिळत असून एकमेकाला शहर काटसह देण्याचा प्रयत्न जोरदारपणे सुरू आहे.
आमदार शरद सोनवणे यांच्या होम पिचवर पिंपळवंडी गटात बंद झाल्याचे पाहायला मिळत असून मयूर पवार कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही अशी भूमिका त्यांच्या समर्थकांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या सहल व्यक्त केली आहे. मयूर पवार यांना माजी आमदार अतुल बेनके यांच्या कार्यकर्त्यांचा छुपा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे.
बोरी गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी होण्याची दाट शक्यता असून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या सुनबाई कविता पवार या उमेदवारी अर्ज मागे घेणार नसल्याचे बोलले जात आहे. कविता पवार यांची माघार होणार नाही असे,पांडुरंग पवार यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे या गटात देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पेच निर्माण झाला आहे पांडुरंग पवार यांना आमदार शरद सोनवणे यांच्या गटाकडून छुपा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. भाजपा नेत्या आशाताई बुचके यांनी ओतूर गटामधून उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांचा सावरगाव गटात देखील अर्ज आहे. त्या कदाचित ओतूर गटातून उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकतात. आपल्याला बिनविरोध निवडून दिले जाऊ शकते या अपेक्षेने कदाचित त्यांनी ओतूर गटामधून देखील अर्ज दाखल केला होता, अशी देखील चर्चा मतदारांमध्ये होत आहे. आशाताई बुचके यांचं काम निश्चित चांगलं राहिलेलं आहे. त्यांच्या कामाचा झपाटा मोठा आहे. त्यांच्या गटातील निवडणुकीकडे सुद्धा संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. या गटात गुलाब पारखी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने जोरदार मुसंडी मारली आहे.