इंगळून येथे शेतात गांजाची झाडे लावणाऱ्यास अटक. ८० गांजाची झाडे जप्त.


नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा
पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीमध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या गांजाच्या उत्पादन व विक्रीवर कारवाई करण्याच्या सूचना पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री संदीप गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार आज रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री प्रमोद शिरसागर यांना गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की जुन्नर पोलीस स्टेशन हद्दीतील इंगळून येथे एका शेतामध्ये अवैधरित्या गांजाची झाडे लावली आहेत. मिळालेल्या बातमीनुसार गुन्हे शाखा तसेच जुन्नर पोलीस स्टेशन कडील स्टाफ यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता गव्हाच्या तसेच बाजरीच्या शेतामध्ये गांजाची झाडे लावल्याचे दिसून आले. सदरचे शेत दिनकर विठ्ठल डामसे वय ६० राहणार इंगळून यांचे असल्याचे समजल्याने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदरची गांजाची झाडे त्यांनी लावल्याचे कबूल केले. सदर ठिकाणी पंचा समक्ष पंचनामा करून गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून त्याबाबत जुन्नर पोलीस स्टेशन येथील पोलीस अंमलदार अजित गेंगजे यांनी फिर्याद दिली असून पुढील कारवाई जुन्नर पोलीस स्टेशन येथे सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री संदीप गिल्ल,अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे , उपविभागीय पोलीस अधिकारी श्री धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक .प्रमोद क्षीरसागर,जुन्नरचे पोलीस निरीक्षक किरण अवचर,महादेव शेलार,रघुनाथ शिंदे,पोसई.ऋषिकेश तिटमे,स.फौज. दीपक साबळे,पोहवा.संदीप वारे,अक्षय नवले,राजू मोमिन,
जुन्नर पोस्टे चे पोहवा सागर हिले, सागर शिंदे, गणेश शिंदे, अजित गेंगजे, संतोष पठारेयांनी केली आहे..

जाहिरात

error: Content is protected !!