नारायणगाव : (प्रतिनिधी ) महाराष्ट्राचे कार्यक्षम, दृढनिश्चयी आणि दूरदृष्टी असलेले लोकप्रिय नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली, भारतीय जनता पार्टीचे जिद्दी, संघटनशक्ती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली, तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,केंद्रीय मंत्री सहकार आणि नागरी हवाई वाहतूक मुरलीधर मोहोळ, नगरविकास व परिवहन राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ,भोसरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार श्री.महेशदादा लांडगे,आमदार श्री.राहुलदादा कुल,आमदार श्री.योगेशअण्णा टिळेकर,आमदार शंकरभाऊ जगताप, आमदार अमितजी गोरखे
आमदार उमाताई खापरे,भाजपा प्रदेश महामंत्री श्री.राजेशजी पांडे,महामंत्री मकरंदजी देशपांडे,प्रदेशाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा मह.राज्य अनुपजी मोरे, भाजपाचे पुणेजिल्हाध्यक्ष प्रदिपदादा कंद,भाजपा जुन्नर विधानसभा प्रमुख आशाताई बुचके या सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली आज भारतीय जनता पार्टी, पुणे जिल्हा ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
आणि अत्यंत अभिमानाने सांगावं वाटतं की,भाजप युवा मोर्चा,पुणे जिल्हाध्यक्ष या महत्त्वाच्या जबाबदारीची धुरा श्री.गणेशभाऊ कवडे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. एक निष्ठावान कार्यकर्ता, जमीनीवरचा नेता, तरुणाईचा आवाज, आणि कार्यक्षम नेतृत्वगुण असलेले गणेशभाऊ यांचं हे पदग्रहण म्हणजे पक्षाच्या विश्वासाची पावती आहे.
यानिमित्ताने श्री क्षेत्र ओझर येथे सकाळपासूनच एक वेगळाच उत्साह,आनंद आणि गौरवाचं वातावरण होतं. संपूर्ण गावकरी बांधव, कार्यकर्ते, हितचिंतक, तरुण मंडळी – सगळ्यांनीच आपले गणेशभाऊंचं जल्लोषात स्वागत केलं.
गुलालाची उधळण…ढोल-ताशांचा गजर…शुभेच्छांचा वर्षाव…आणि सन्मानाचा सत्कार…
हे सर्व पाहताना प्रत्येकाच्या डोळ्यांत अभिमान होता आणि मनात एकच भावना –आपला माणूस आज पुढे जातोय!
गावकऱ्यांनी दिलेलं प्रेम, आपुलकी, आणि पाठबळ हेच गणेशभाऊंच्या आगामी कार्यकाळात ऊर्जा देणारं आहे.आजपासून एक नवा अध्याय सुरू झाला आहे – भाजप युवा मोर्चा, पुणे जिल्हा यामध्ये नवचैतन्य, नवे विचार,आणि नव्या दिशा घेऊन वाटचाल होणार आहे.
गणेशभाऊंना त्यांच्या नवीन जबाबदारीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
आपल्या नेतृत्वाखाली पुणे जिल्ह्यातील युवा शक्ती अधिक बळकट होईल,संघटन अधिक मजबूत होईल,आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा अजून उंच फडकवला जाईल,हीच अपेक्षा!