धनगरवाडीत प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त. अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; साडेचार लाखांचा मुद्देमाल ताब्यात.

नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा

अन्न व औषध प्रशासन विभागाने धनगरवाडी (ता. जुन्नर) येथे केलेल्या कारवाईत प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला असून याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अन्न सुरक्षा अधिकारी संतोष शामराव सावंत (वय 40) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारुती सीताराम शेळके (वय 66, रा. धनगरवाडी, पोस्ट नारायणगाव) यांच्याविरुद्ध नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 136/2026 दाखल करण्यात आला आहे. दि. 9 जून 2026 रोजी दुपारी 2.15 ते सायंकाळी 5.30 या वेळेत धनगरवाडी येथील शेळके यांच्या पत्राशेड गोडाऊनमध्ये छापा टाकण्यात आला. यावेळी केशरयुक्त विमल पान मसाला, व्ही-1 सुगंधित तंबाखू, रत्ना तंबाखू, हिरा पान मसाला, रॉयल 717 तंबाखू, महक चैनी फिल्टर तंबाखू, मिराज चुनामिश्रित तंबाखू तसेच आंटी गोड सुपारी आदी विविध प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा आढळून आला. कारवाईदरम्यान एकूण 4 लाख 48 हजार 506 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधित व्यक्तीने प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा करून विक्री केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 123, 223, 274, 275 तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 मधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास नारायणगाव पोलीस करीत आ

जाहिरात

error: Content is protected !!