मंचर : (प्रतिनिधी) जांभोरी तळेघर रस्ता मुसळधार पावसाने खचला आहे. जांभोरी तळेघर या ठिकाणी मुसळधार पावसाने आज रस्ता खचला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ येऊन रस्ता दुरुस्त करुन द्यावे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले यांनी आंदोलनाला बसण्याचा इशारा दिला आहे माजी गृहमंत्री सहकारमंत्री तथा आमदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली साहेबांचे स्विय सहाय्यक रामदास वळसे पाटील साहेब काळूदास दांगट साहेब यांच्या कानावर विषय घातला आहे. या वेळी माजी सरपंच संजय दादा केंगले शामराव बांबळे गणेश केंगले युवा कार्यकर्ते अरुण केंगले माजी सरपंच सखुबाई केंगले शिवराम केंगले जांभोरी गावच्या सरपंच सुनंदाताई पारधी उपसरपंच बबन केंगले सुनिल गिरंगे, पोलिस पाटील नवनाथ केंगले पोलिस पाटील सोनाली पोटे अमोल गिरंगे आकाश पारधी निलेश केंगले जांभोरी तळेघर ग्रामस्थ उपस्थित होते