400 केव्ही वाहीनीचे मनोरे उभे करण्यास शेतकऱ्यांचा विरोध. जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठक.


नारायणगाव (प्रतिनिधी )आळे येथील बागायती क्षेत्रात उच्च दाबाच्या 400 केव्हीचे मनोरे उभे करण्यास शेतकऱ्यांचा विरोध कायम असून आळे गावचे शेतकरी आक्रमक पवित्रा घेत असून ती वाहीनी गावच्या दक्षिणेकडून डोंगराळभागातून फेर सर्व्हे करून नेण्याबाबत विचार करावा व बागायती क्षेत्रातून काम सुरू करू नये अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतलेली असून ही बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बोलवली होती,या बैठकिला आ. शरद सोनवणे व मा.आमदार अतुल बेनके उपस्थित होते,तसेच स्थानिक बाधित शेतकरी संजय गुंजाळ ,अॅड विजय कुऱ्हाडे, जिल्हा परिषद माजी सदस्य प्रसन्ना डोके आधी शेतकरी उपस्थित होते.यांनी शेतकऱ्यांचे वतीने बाजू मांडली, जिल्हाधिकारी डुडी यांनी या कामास प्रचंड उशीर झालेला असून मुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तातडीने काम सुरु करण्याबाबत सक्त सुचना दिलेल्या असून ते काम थांबणे अशक्य असल्याचे सांगितले व केवळ मोबदल्यात बाबाच चर्चा करता येईल असे सुचविले शिवाय तसे पत्र देखील आमदार सोनवणे यांनी दिल्याचे सांगून त्या पत्राचे वाचनही केले. माजी आमदार बेनके यांनी यावर चर्चेत भाग घेतला व मी आमदार असलेल्या काळात हे काम होवू दिले नव्हते यावर तात्कालीन जिल्हाधिकारी देशमुख यांचेकडे बैठक घेवून फेरसर्व्हे करण्याबाबत ठरले होते त्याचा व्यवस्थित पाठपुरावा झाला नाही. परंतु शेतकरी जी मागणी करत आहेत त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांचेकडे विषय मांडून फेर सर्व्हे बाबत चर्चा करणे करीता दि 7 मे रोजी मुंबईत भेट घेवून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार असून आमदार शरद सोनवणे यांनी देखील मुख्यमंत्री महोदयांची भेट घेवून पुन्हा प्रयत्न करावा असे सुचित केले त्यानुसार आमदार सोनवणे यांनी देखील संमती दर्शविली व चौंडी अहिल्यानगर येथे कॅबीनेटची बैठक होणार आहे त्या ठिकाणी जावून स्वत:मुख्यमंत्री महोदयांना भेटणार असल्याचे सांगीतले. पालकमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होईपर्यंत टॉवर उभे केले जाणार नाहीत असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.

जाहिरात

error: Content is protected !!