मध्यरात्री घरावर दगडफेक; कोयत्याने दहशत.दुचाकी, कार आणि घराच्या पत्र्यांचे नुकसान; १० ते ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा

जुन्नर तालुक्यातील भोरवाडी येथील पवारमळा परिसरात मध्यरात्री १० ते ११ जणांच्या जमावाने एका घरावर दगडफेक करून दुचाकी, कार आणि घराच्या सिमेंटच्या पत्र्यांचे नुकसान केल्याची घटना घडली. या वेळी फिर्यादी महिलेला मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार नारायणगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी प्रसाद चिंतामण हिंगे (रा. खोडद, गडाचीवाडी, ता. जुन्नर) याच्यासह १० ते ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितीका प्रशांत राजपूत (वय २२, रा. भोरवाडी, ता. जुन्नर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सोमवार (दि.12 ) रोजी मध्यरात्री सुमारे १२.१५ वाजण्याच्या सुमारास भोरवाडी येथील पवारमळा परिसरात त्यांच्या राहत्या घरी हा प्रकार घडला.

आरोपींच्या जमावाने घराजवळ गर्दी करून दगडफेक केली. त्यांच्या हातात कोयते असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या वेळी दुचाकी (क्र. एमएच १४ बीएफ ४४९५) आणि मारुती सुझुकी स्विफ्ट कार (क्र. एमएच १४ जीएस ९१८५) यांची तोडफोड करण्यात आली. तसेच घराच्या सिमेंटच्या पत्र्यांचे नुकसान करण्यात आले. जमावातील एका व्यक्तीने फिर्यादीच्या कानशिलात मारल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

फिर्यादीचे पती प्रशांत राजपूत यांनी जमावातील प्रसाद चिंतामण हिंगे याला ओळखले असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून मारहाण व दमदाटी केली, तसेच परिसरात दहशत निर्माण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांसह भारतीय शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार राम तळ

जाहिरात

error: Content is protected !!