नारायणगाव :
श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना लि., जुन्नर-आंबेगावच्या सन २०२६-२७ च्या ४१ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ बुधवार (दि. ७) रोजी सकाळी ९.३० वाजता कारखाना कार्यस्थळावर होणार आहेअशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी दिली. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या शुभहस्ते हा समारंभ होणार असून, जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. प्रमुख उपस्थितांमध्ये माजी आमदार दिलीपराव वळसे पाटील, आमदार अतुल बेनके, आमदार बाळासाहेब दांगट तसेच जुन्नर बाजार समिती सभापती संजयशेठ काळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर घुले, व्हाईस चेअरमन अशोक घोलप व संचालक मंडळ अधिकारी कर्मचारी उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. कारखान्याचे अध्यक्ष संतोष शेरकर म्हणाले की यंदाच्या वर्षी शासनाच्या धोरणानुसार 15 ऑक्टोबर पासून साखर कारखाने सुरू करण्याचे आदेश असलेले कारखान्यांनी त्यानुसार गळीत हंगामाची पूर्ण तयारी केली असून ऊस तोडणी साठी मजूर उपलब्ध असून दसरा दिवाळी सणाचा ऊस तोडणी मजूर येण्यास अडथळा येणार नाही. स्वतःच्या वर्षी कारखान्याने दहा लाख मीटरने उद्दिष्ट ठेवले असून कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी विघ्नहरलाच ऊस गाळपाला घालावा असे आवाहन केले असून आजूबाजूच्या कारखान्याप्रमाणेच उसाला बाजार भाव दिला जाईल असे शेरकर यांनी सांगितले. कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्यात आली असून कार्यक्षेत्रातील सर्व उसाची तोडणी तारखेनुसार वेळेवर केली जाईल. तसेच गरज पडल्यास गेट केन ऊस देखील उपलब्ध करण्याचा प्रयत्न कारखान्याचा असल्याचे त्यांनी सांगितले.