नारायणगाव :
आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी तसेच शेतकरी व ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र)चे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते दिलीपराव वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (शुक्रवार, दि. २) व उद्या (शनिवार, दि. ३ ऑक्टोबर) दुष्काळ पाहणी व गावभेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या दौऱ्यात मतदारसंघातील पाणीटंचाई, पिकांचे नुकसान, चारा उपलब्धता तसेच शेतकरी व ग्रामस्थांच्या विविध अडचणींचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात येणार आहे. संबंधित गावांमध्ये नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व मागण्या जाणून घेतल्या जाणार आहेत.
आजचा दौरा : सातगाव पठार भाग
शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता पारगाव (पेठ), सायंकाळी ५ वाजता पेठ आणि सायंकाळी ६ वाजता कुरवंडी येथे पाहणी दौरा होणार आहे.
उद्या आंबेगाव भागात दौरा
शनिवार, दि. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता पहाडदरा, ९.३० वाजता शिरदाळे, १० वाजता धामणी, १०.३० वाजता लोणी, ११.३० वाजता वडगाव पीर आणि दुपारी १२ वाजता मांदळेवाडी येथे भेटी देण्यात येणार आहेत.
शिरूर भागातील दौरा
दुपारी १ वाजता कान्हूर मेसाई, २ वाजता मोराची चिंचोली, ३ वाजता धामारी, ४ वाजता पाबळ आणि सायंकाळी ५ वाजता केंदूर येथे दुष्काळ पाहणी व गावभेट होणार आहे.
या पाहणी दौऱ्यास मतदारसंघातील संबंधित पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, महायुतीचे प्रमुख कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांच्या समस्या, मागण्या व अडचणी दिलीपराव वळसे पाटील यांच्यासमोर मांडण्यासाठी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.