येणेरे ग्रामसभेत विविध विकासकामांवर सविस्तर चर्चा. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जोशी यांनी सरपंच भुजबळ यांच्या कार्याचे केले कौतुक.

नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा

येणेरे (ता. जुन्नर) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. सरपंच अमोल चंद्रकांत मुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेस उपसरपंच मिनल सचिन ढोले, ग्रामसेवक वैभव सदाकाळ यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसभेत गावातील विविध नागरी समस्या तसेच विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामसभेच्या सुरुवातीस सचिव वैभव सदाकळ मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले. त्यास ग्रामस्थांनी एकमताने मंजुरी दिली. त्यानंतर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. ‘आमचा गाव, आमचा विकास’ या संकल्पनेअंतर्गत गावाचा ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यासाठी आवश्यक विकासकामांची प्राधान्यक्रमाने निवड करण्याबाबत चर्चा झाली. प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण सर्वेक्षणातील कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीचे वाचन करून वस्तुस्थितीची खात्री करण्याचा विषयही चर्चेत घेण्यात आला. घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ ची प्रभावी अंमलबजावणी व जनजागृती अभियान राबविणे, प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करणे, तसेच महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम २०२६ बाबत ग्रामस्थांना माहिती देणे यावरही चर्चा झाली. विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशनअंतर्गत ग्रामपंचायतीच्या बँक खात्याच्या नावात बदल करण्याबाबत चर्चा करण्यात आली. सन २०२६-२७ च्या लेबर बजेटला मंजुरी देणे, ग्रामरोजगार सेवकाची नियुक्ती करणे, जिल्हा परिषद व शासनाच्या विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी पात्र लाभार्थी निवडणे, तसेच राष्ट्रीय लोकअदालत दिनांक १२ सप्टेंबर २०२६ रोजी होणार असल्याबाबत ग्रामस्थांना माहिती देण्यात आली. वरिष्ठ कार्यालयांकडून प्राप्त परिपत्रके व शासन निर्णयांचे वाचन करण्यात आले. बालविवाह रोखण्यासाठी ग्रामस्थांकडून प्रतिज्ञा घेऊन विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीच्या विकास योजनांबाबतही चर्चा झाली. गावातील विविध विकासकामांना गती देण्याबरोबरच शासनाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करणे आणि ग्रामस्थांच्या सहभागातून गावाचा विकास साधण्यावर ग्रामसभेत भर देण्यात आला. विविध विषयांवर झालेल्या चर्चेमुळे ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. दरम्यान पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूषण जोशी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे ग्रामसभेला संबोधित केले. येणेरे गावचे सरपंच अमोल अमोल भुजबळ यांच्या कामाचे कौतुक करून इतरांनी येणाऱ्या गावासारखा आदर्श घ्यावा असे मनोगत व्यक्त करून झालेल्या ग्रामसभेचे कौतुक केले. @फोटो खालील ओळ – येनेरे (ता. जुन्नर) ग्रामपंचायत ग्रामसभा पार पडली खेळीमेळीत. (छाया – सुरेश वाणी )

येणेरे ग्रामसभेत विविध विकासकामांवर सविस्तर चर्चा. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जोशी यांनी सरपंच भुजबळ यांचे कार्याचे केले कौतुक.

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा येणेरे (ता. जुन्नर) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. सरपंच अमोल चंद्रकांत मुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेस उपसरपंच मिनल सचिन ढोले, ग्रामसेवक वैभव सदाकाळ यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसभेत गावातील विविध नागरी समस्या तसेच विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामसभेच्या सुरुवातीस सचिव वैभव सदाकळ मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले. त्यास ग्रामस्थांनी एकमताने मंजुरी दिली. त्यानंतर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. ‘आमचा गाव, आमचा विकास’ या संकल्पनेअंतर्गत गावाचा ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यासाठी आवश्यक विकासकामांची प्राधान्यक्रमाने निवड करण्याबाबत चर्चा झाली. प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण सर्वेक्षणातील कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीचे वाचन करून वस्तुस्थितीची खात्री करण्याचा विषयही चर्चेत घेण्यात आला. घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ ची प्रभावी अंमलबजावणी व जनजागृती अभियान राबविणे, प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करणे, तसेच महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम २०२६ बाबत ग्रामस्थांना माहिती देणे यावरही चर्चा झाली. विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशनअंतर्गत ग्रामपंचायतीच्या बँक खात्याच्या नावात बदल करण्याबाबत चर्चा करण्यात आली. सन २०२६-२७ च्या लेबर बजेटला मंजुरी देणे, ग्रामरोजगार सेवकाची नियुक्ती करणे, जिल्हा परिषद व शासनाच्या विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी पात्र लाभार्थी निवडणे, तसेच राष्ट्रीय लोकअदालत दिनांक १२ सप्टेंबर २०२६ रोजी होणार असल्याबाबत ग्रामस्थांना माहिती देण्यात आली. वरिष्ठ कार्यालयांकडून प्राप्त परिपत्रके व शासन निर्णयांचे वाचन करण्यात आले. बालविवाह रोखण्यासाठी ग्रामस्थांकडून प्रतिज्ञा घेऊन विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीच्या विकास योजनांबाबतही चर्चा झाली. गावातील विविध विकासकामांना गती देण्याबरोबरच शासनाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करणे आणि ग्रामस्थांच्या सहभागातून गावाचा विकास साधण्यावर ग्रामसभेत भर देण्यात आला. विविध विषयांवर झालेल्या चर्चेमुळे ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. दरम्यान पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूषण जोशी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे ग्रामसभेला संबोधित केले. येणेरे गावचे सरपंच अमोल अमोल भुजबळ यांच्या कामाचे कौतुक करून इतरांनी येणाऱ्या गावासारखा आदर्श घ्यावा असे मनोगत व्यक्त करून झालेल्या ग्रामसभेचे कौतुक केले. @फोटो खालील ओळ – येनेरे (ता. जुन्नर) ग्रामपंचायत ग्रामसभा पार पडली खेळीमेळीत. (छाया – सुरेश वाणी )

जाहिरात

error: Content is protected !!