विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यातील कोंढवळ येथील वन विभागाच्या हरकतीमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बंधाऱ्याच्या कामाची आज स्थानिक ग्रामस्थांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली. आवश्यक तांत्रिक सुधारणा करून हे काम मार्गी लावण्यासाठी प्रशासन स्तरावर गतीने पाठपुरावा सुरू असून, जलसंपदा विभाग आणि वन विभागाकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
हा बंधारा कोंढवळ गावापासून साधारण दीड ते दोन किलोमीटर अंतरावर दुर्गम जंगल परिसरात असल्याने तेथे जाण्यासाठी दुचाकीने प्रवास करून महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. अनेक वर्षांनंतर दुचाकीवरून असा दुर्गम दौरा करण्याचा योग आला. या बंधाऱ्यामुळे कोंढवळ परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून श्री क्षेत्र भीमाशंकर भागातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासही मोठी मदत होणार आहे. स्थानिक ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी आता प्रत्यक्षात उतरवण्यासाठी शासन आणि प्रशासन स्तरावर आपण सातत्याने पाठपुरावा करत आहोत. लवकरच हे काम वेगाने सुरू होऊन शेतकरी हिताचा हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास यावेळी ग्रामस्थांना दिला.
यावेळी पुणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, सभापती कैलासबुवा काळे, उपसभापती ज्योती पारधी, शीलाताई लोहकरे, सुभाष मोरमारे, प्रकाश घोलप, संजय गवारी, मारुती लोहकरे, गावच्या सरपंच सविता कोकाटे, संदीप चपटे, प्रवीण पारधी, प्रदीप आमोडकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले. खरेदी विक्री संघांचे उपाध्यक्ष शामराव बांबळे.इंदुबाई लोहकरे, नामदेव कोंढवळे, वास्तुविशारद हेमंत पाटील, निलेश थोरात, निलेश बोऱ्हाडे, संतोष सैद प्रांत आधिकारी अर्चना तांबे. तहसीलदार सचिन वाघ गटविकास आधिकारी प्रमिला वाळुंज . पोलीस महानिरीक्षक सागर पवार
यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.