गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेत पाणी कलश नारायणगाव येथून जल यात्रेसाठी मार्गस्थ

नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा-2026 निमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित केलेल्या गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेत
सहभागी होण्यासाठी कुकडी-घोड खोऱ्यातील पवित्र जल कलशामध्ये घेऊन जल कलश नारायणगाव येथून जल यात्रेसाठी मार्गस्थ झाला. अशी माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर यांनी दिली.
या निमित्त आज येडगाव येथील धरण जलाशयाजवळ आयोजित कार्यक्रमात जल कलशाचे पूजन आमदार शरद सोनवणे, पारनेरचे आमदार काशिनाथ दाते, माजी आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष बाळासाहेब औटी, उपकार्यकारी अभियंता रवींद्र हांडे, जिल्हा परिषद सदस्य स्मिता कणसे, पंचायत समिती सदस्य संभाजी चव्हाण,जयसिंग पोटे व शेतकरी उपस्थित होते.
जलव्यवस्थापनाच्या माध्यमातून संपूर्ण देशाला दिशा दाखवणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या महान कार्याचा जागर करण्यासाठी आणि जलव्यवस्थापनाबाबत समाजात व्यापक लोकजागृती निर्माण करण्याच्या उ‌द्देशाने, महाराष्ट्र शासनाच्या वतीने विशेष माहितीपूर्ण आणि सांस्कृतिक दौ-याचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या जलयात्रेत महाराष्ट्रातील ३० विविध नदी खोऱ्यांतील 101 नद्यांमधील पवित्र जल व चौंडी येथील पवित्र माती कलशात घेऊन ५०० जल-यात्री महाराष्ट्रातील ५ जिल्हे आणि मध्य प्रदेशातील २ जिल्ह्यांमधून प्रवास करुन ही जल यात्रा २९ एप्रिल २०२६ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे स्मृतीस्थान असलेल्या महेश्वर (जि. खरगोन, मध्य प्रदेश) येथे रवाना होणार आहे. या जलयात्रेत सहभागी होण्यासाठी कुकडी-घोड खोऱ्यातील पवित्र जल कलशामध्ये घेऊन जल कलश आज नारायणगाव येथून त्र्यंबकेश्वर येथे रवाना झाला. अशी माहिती गणेश नान्नोर यांनी दिली.

जाहिरात

error: Content is protected !!