नारायणगाव पोलीसांची कामगिरी . चोरीला गेलेले 25 मोबाईल मूळ मालकांना केले परत .

विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा : नारायणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत फेब्रुवारी २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत हरविलेले मोबाईल शोधण्याबाबत उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली आहे. CEIR पोर्टल तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून पोलीसांनी तब्बल ४ लाख रुपये किंमतीचे विविध कंपन्यांचे एकूण २५ मोबाईल फोन शोधून काढले असून ते संबंधित मालकांना परत देण्यात आले आहेत. या विशेष मोहिमेचे काम नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपागे यांनी केले
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी (जुन्नर विभाग) धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण संपांगे यांनी पथकाला आवश्यक त्या सूचना दिल्या.
या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक शेटे व तपास पथकातील पोलीस कर्मचारी मंगेश लोखंडे, सोमनाथ डोके, सत्यम केळकर, टिलेश जाधव यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मोबाईल शोधून काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
यापूर्वी देखील अशाच प्रकारे ९ लाख ९६ हजार रुपये किंमतीचे ३८ मोबाईल शोधून नागरिकांना परत करण्यात आले होते. त्यामुळे फेब्रुवारी २०२५ ते आजपर्यंत एकूण १३ लाख ९६ हजार रुपये किंमतीचे ६३ मोबाईल फोन हस्तगत करून संबंधितांना परत देण्यात आले आहेत.
नारायणगाव पोलीसांच्या या कार्यवाहीमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

जाहिरात

error: Content is protected !!