डिंगोरे येथे जबरी चोरी. वृद्धाचा कान तुटला.

*विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा*
डिंगोरे गावात दत्तवाडी येथे जबरी चोरी. चोरट्याकडून सहादू सावळेराम उकिरडे यांना जबर मारहाण झाली असून ते गंभीर जखमी झाले आहेत.त्यांच्या कानाला दुखापत झाली असून कान तुटल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. जखमी व्यक्तीवर आळेफाटा येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागामध्ये आता पुन्हा चोऱ्यांचे सत्र सुरू झाले आहे. शेतामध्ये राहणाऱ्या लोकांनी स्वतःच्या मालमत्तेची काळजी करत असताना सोन्याचे दागिने घरी न ठेवता बँकेमध्ये ठेवावेत असे आवाहन वारंवार पोलिसांकडून करण्यात येत आहे तथापि पोलिसांच्या सूचनेची म्हणावी अशी दखल नागरिकांकडून घेतली जात असल्याची खंत देखील व्यक्त केली जात आहे. गावातील प्रत्येक वाडी वस्तीवर स्थानिक तरुणांनी गस्त घालण्याची आवश्यकता आहे. तसेच पोलिसांनी देखील सतर्क राहून गावोगावच्या गस्त घालणाऱ्या तरुण मुलांना ओळखपत्र व काठी देण्याची व्यवस्था करावी अशी देखील मागणी पुढे येत आहे.

जाहिरात

error: Content is protected !!