नारायणगाव जिल्हा परिषद गटात नेहा पाटे यांची आघाडी.

*विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा*
नारायणगाव जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेच्या उमेदवार नेहा पाटे यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली असून नारायणगाव गन व वारुळवाडी गण या ठिकाणी देखील मतदारांचा त्यांना अधिकचा प्रतिसाद मिळत आहे. प्रियांका शेळके धनुष्यबाण की घड्याळ? हा तिढा उशिरा सुटल्यामुळे अद्याप त्या प्रचारामध्ये खूप मागे आहेत. मकरंद पाटे यांच्या पत्नी पंचायत समितीच्या गणामधून उभ्या असून त्यांनी देखील मतदारांशी संवाद अधिक गतीने साधण्यास सुरुवात केली आहे. रूपाली मेहेत्रे यांनी देखील खूप अगोदर प्रचाराला सुरुवात केली. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस नंतर शिवसेना व फायनल राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रचार चालवला आहे. त्यामुळे मतदार देखील खूप कन्फ्युज मध्ये आहेत
नेहा पाटे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांची फौज मोठी आहे. स्वतः आमदार शरद सोनवणे नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे व त्यांची संपूर्ण युवा टीम या प्रचार यंत्रणेचे सूत्रधार आहेत. वारुळवाडी नारायणगाव, मांजरवाडी गुंजाळवाडी,धनगरवाडी या ठिकाणच्या वाढीवस्तीवर त्यांचा मतदारांशी दोन वेळा संपर्क झाला आहे. धनगरवाडी गावच्या युवकांनी नेहा पाटे यांना पाठिंबा दर्शवल्याने धनुष्यबाणाची बाजू अधिक बळकट होताना दिसत आहे. नारायणगाव जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून नेत्याने कामाला सुरुवात करायला हवी. प्रियंका शेळके उच्चशिक्षित तरुणी असून सामान्य जनतेबद्दल त्यांना खूप आपुलकी आहे. त्यांना अधिकचा फ्रीडम मिळाल्यास व राष्ट्रवादी काँग्रेसच्या टीमने मतदारांशी संवाद साधण्यासाठी एक विचाराने व एक दिलाने काम केल्यास शेळके देखील मतदारांच्या मनात स्थान निर्माण करू शकतात. दरम्यान सध्या तरी नेहा पाटे व त्यांचे दोन गणातील सहकारी प्रचारात खूप पुढे गेले आहेत.

जाहिरात

error: Content is protected !!