बारव गटात माई लांडे यांची प्रचारात जोरदार मुसंडी.

*विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा*
बारव जिल्हा परिषद गटामध्ये माई लांडे यांची उमेदवारी उशिरा जाहीर झाली असली तरी त्यांनी आता प्रचारामध्ये चांगलीच आघाडी घेतली आहे. सुनिता बोराडे राष्ट्रवादी की शिवसेना असा घोळ अनेक दिवस सुरू राहिल्याने त्यांना शिवसेनेत संधी मिळाली असून त्यांचे कार्यकर्ते देखील त्यांच्या विजयासाठी प्रयत्नशील आहेत. जिल्हा बँकेचे संचालक भाऊ देवाडे सध्या सायलेंट मोड मध्ये आहेत. पक्षशिस्त म्हणून ते राष्ट्रवादीसोबत आहेत. आमदार शरद सोनवणे यांच्या भेटीला ते गेल्यामुळे त्यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये काही प्रमाणात अविश्वासाचे वातावरण झालं आहे. तथापि त्यांनी जर आपली भूमिका स्पष्ट करून मी पक्ष सोबतच आहे असे जर काही भूमिका घेतली तर त्यांच्याबद्दल असलेले संशयाचे ढग कमी होऊ शकतात. अर्थात त्यांनी रिफ्रेश व्हायचं की जे चाललय व चालवले तेच सुरू ठेवायचं हा अधिकार त्यांना आहे. महिलांनी व अमोल लांडे यांनी मतदारसंघातील प्रत्येक गाव पिंजून काढले आहे. आदिवासी भागात देवराम लांडे यांची छाप सर्वाधिक आहे. दत्ता गवारी व त्यांचे सगळे सहकारी या निवडणुकीत एकजुटीने धनुष्यबाणाचे काम करीत आहेत. मारुती वायाळ काळू शेळके यांचे पुन्हा शिवसेनेत प्रवेश झाल्याने त्यांच्या प्रवेशाचा जन्मतावर किती पगडा पडेल हे निकालानंतर दिसून येईल. माई लांडे आणि सुनीता बोऱ्हाडे यांच्या निवडणुकीकडे संपूर्ण जुन्नर तालुक्याचे लक्ष लागले असून एक लक्षवेधी गट म्हणून पाहिले जात आहे. देवराम लांडे,अमोल लांडे व मायी लांडे यांचे या मतदारसंघातील आदिवासी भागाच्या प्रत्येक कुटुंबाचे घरोव्याचे संबंध असल्याने याचा फायदा त्यांना अधिकच होऊ शकतो. सुनिता बोऱ्हाडे यांनी देखील गेले चार-पाच महिने संपूर्ण मतदारसंघ संपर्कात ठेवला आहे.

जाहिरात

error: Content is protected !!