नारायणगाव गटात राष्ट्रवादीने प्रियंका शेळके यांना घड्याळाचे चिन्हावर उमेदवारी दिल्यास विजय सोपा.

विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा
नारायणगाव जिल्हा परिषद गटामधून राष्ट्रवादी काँग्रेसने प्रियंका शेळके यांना घड्याळाच्या चिन्हावर उमेदवारी दिल्यास व रूपाली मेहेत्रे या पंचायत समितीला लढल्यास नारायणगाव गटाची जिल्हा परिषद निवडणूक लक्षवेधी ठरून राष्ट्रवादी काँग्रेसला या गटात विजयासाठी फारशी मेहनत करावी लागणार नाही. प्रियंका शेळके यांचे व्यक्तिगत काम आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची ताकद. तसेच ओबीसी मतांचा टक्का हा तिहेरी फायदा प्रियांका शेळके यांना होऊ शकतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने व प्रामुख्याने खासदार कोल्हे व माजी आमदार बेनके यांनी शेळके यांच्या हातात घड्याळ बांधून त्यांना उमेदवारी द्यावी असे सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून दिसून येत आहे. बोरकर यांनी निवडणुकीतून एक्झिट घेतल्याने त्यांनी जरी ऐनवेळी आतून कोणालाही मदत केली तरी प्रियंका शेळके राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारी दिल्यास या गटात राष्ट्रवादी काँग्रेसचा विजयाचा नारळ फुटू शकतो. नेहा पाटे विरुद्ध प्रियंका शेळके असा सामना चांगलाच रंगवू शकतो. बाबू पाटे यांच्याकडे कार्यकर्त्यांचं वलय मोठं असलं तरी प्रियंका शेळके यांची लोकप्रियता विजय खेचून आणू शकते. शेवटी काम बोलते. अर्थात बाबू पाटे यांना देखील कमी लेखून चालणार नाही. जर शेळके विरुद्ध पाटे अशी लढत झाले तर पाटे यांना आपली पूर्ण ताकद पणाला लावावी लागणार आहे.

जाहिरात

error: Content is protected !!