मंगेश काकडे यांना यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी द्या कार्यकर्त्यांचा आग्रह. मयूर पवार यांना शिवसेनेतून उमेदवारी मिळावी कार्यकर्ते जोरात.

नारायणगाव :(प्रतिनिधी ) मंगेश काकडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेद्वारी द्या असा पिंपळवंडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा आग्रह असून या बाबत बैठकांवर बैठका सुरू आहेत तर शिवसेनेकडून मयूर पवार यांनाच उमेद्वारी मिळावी म्हणून पिंपळवंडी परिसरातील कार्यकर्ते आग्रही असून या पक्षाकडून मयूर पवार यांनाच उमेदवारी मिळण्याचे संकेत मिळत आहेत.मयूर पवार यांचा युवकांमधील संपर्क जि. प.गटातील नातेसंबंध व विद्यमान आमदार शरद सोनवणे यांचे कार्यकर्ते आणी धनुष्यबाणाचे चिन्ह जे लोकसभा व विधीनसभेला शिवसैनिकांना मतदानासाठी दिसत नव्हते.या सगळ्यागोष्टंमुळे शिवसैनिकांना वेगळे बळ आलेले पहायला मिळत आहे.. मंगेश काकडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन विजय कुऱ्हाडे यांची नाराजी पक्ष नेतृत्व काढू शकतात.विजय कुऱ्हाडे यांना पक्षात मोठी जबाबदारी अजितदादा देवू शकतात.व दोन्ही रा काँ पक्षाचे नेते मंगेश काकडे यांना पसंती देवू शकतात असा कल आहे. मंगेश आण्णा काकडे यांनी भूमिका घ्यायला वेळ लावला असला तरी अजूनही घड्याळ चिन्हावर ते निवडणूक लढले तरी हरकत नाही असे अनेकांचे मत आहे.एक मताने झालेला पराभव ही मोठी सहानुभूती त्यांना असल्याने ते विजयाचा दावा करताना पहायला मिळत आहेत.. सततचा लोकसंग्रह कामी येवू शकतो. तसेच विद्यमान आमदारांच्या गावात घड्याळाचा उमेद्वार निवडून आणायचा असेल तर मात्र मंगेशआण्णा काकडेंनाच उमेद्वारी द्यावी असे रा काँ पक्षातील अनेकांचे मत असल्याचे समजते. पण विजय कुऱ्हाडे हे अतुल बेनके व डाॅ अमोल कोल्हे यांचे जीवलग सहकारी असल्याने व गेल्या काही दिवसांत त्यांचा प्रचाराचा वेग पहाता ते थांबतील असे वाटत नसले तरी मोठी संधी भविष्यात अजितदादा पवार देत असतील व तसा त्यांनी शब्द दिला तर आमदार शरददादा सोनवणे यांचा वारू रोखण्यात मंगेश यशश्वी ठरतील असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.
शेवटी दोन रा काँ काय भूमिका घेतात? तसेच शिवसेना (उबाठा) काय निर्णय घेणार यावर सगळी गणितं अवलंबून आहेत.
एकंदर मंगेशआण्णा काकडे राष्ट्रवादीत जाण्यास अनुकूल दिसत असताना काही पक्षातले लोक त्यांना हमखास विजया साठी संधी देण्यास तयार असल्याचे समजते.
शेवटी अतुल बेनके यांची भूमिका महत्वाची थांबणार असून विजय कुऱ्हाडे यांनी जागी प्रचारात आघाडी घेतली असली आणि त्यांचा अधिकचा खर्च झाला असला तरी अतुल बॅंके विजय कुऱ्हाडे यांना थांबवू शकतात.

जाहिरात

error: Content is protected !!