विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे अद्याप घोषणा होईना त्यामुळे इच्छुक कार्यकर्त्यांचा जिव लागला टांगणीला लागलाआहे. त्यातच अनेक गटांमध्ये कोणत्याच राजकीय पक्षांकडून अधिकृत उमेदवारी जाहीर होत नसल्यामुळे कार्यकर्ते बुचकळ्यात पडल्याचे दिसून येत आहेत. काही इच्छुक कार्यकर्ते पक्षाकडून आपली उमेदवारी अंतिम झाली नसतानाही स्वतःच फ्लेक्स तयार करून मतदारांची करमणूक करीत आहेत. प्रामुख्याने असा प्रकार बारव गटामध्ये होत आहे. या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कडून माई लांडे व सुनीता बोऱ्हाडे दोघेही इच्छुक आहेत. मतदार संघात दोघांचीही ताकद चांगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते या गटातील सुनीता बोऱ्हाडे यांना उमेदवारी द्यावी असा आग्रह करीत आहेत. तर आदिवासी भागातील कार्यकर्त्यांना माई लांडे यांनाच राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी दिली जावी असा आग्रह होताना दिसत आहे. या गटात शिवसेनेने देखील आपले उमेदवार प्रचारामध्ये उतरवले आहेत. माई लांडे अथवा सुनीता बोराडे यापैकी एकाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळू शकते. ज्यांना मिळणार नाही त्यांना शिवसेनेकडून देखील उमेदवारी दिली जाऊ शकते. शिवसेनेकडून उमेदवारी सुनीता बोऱ्हाडे यांना मिळण्याची अधिक शक्यता आहे. बोऱ्हाडे यांचे कार्यकर्ते आमदार शरद सोनवणे यांच्या देखील संपर्कात आहेत. दत्ता गवारी यांची देखील सुनिता बोऱ्हाडे यांनी शिवसेनेत यावे अशी अपेक्षा आहे. माजी आमदार बेनके यांनी पिंपळवंडी व बारव गटामध्ये कार्यकर्त्यांची फार उत्सुकता फार ताणू नये. त्याचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुलाब पारखे वेळीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतले असते तर कदाचित ते परत गेले नसते. गुलाब पारखे व्यक्तिमत्व निश्चित चांगले आहे परंतु घडीत इकडे तर घडीत तिकडे त्याचा काही प्रमाणात त्यांना फटका बसू शकतो. विकी पारखे यांचे युवकांमध्ये चांगले स्थान आहे.