विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा : नारायणगाव (तालुका जुन्नर) येथील कृषी विज्ञान केंद्राच्या जवळ वनविभागाच्या हद्दीत शॉर्टसर्किट अथवा अज्ञात कारणामुळे आज (दि. 8)दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागण्याची घटना घडली. येथून अवघ्या काही अंतरावर असलेल्या व आजच सुरू झालेल्या ग्लोबल कृषी महोत्सवाच्या मुख्य मंडपापासून जवळच ही आग लागली होती. कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा चालू असतानाच येथे धूर कसा? हे पाहिल्यानंतर तेथील काही शेतकऱ्यांच्या नजरेस ही घटना लक्षात आल्यामुळे तेथे कार्यरत असलेले शेतमजूर व कृषी विज्ञान केंद्राचे कर्मचारी घटनास्थळी गेले. येथील शिक्षक कर्मचारी व शेतमजुरांच्या सतर्कतेमुळे आग आटोक्यात आली. ही आग विझवण्यासाठी ग्रामोन्नती मंडळाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी तसेच वनमजुरांनी व शिक्षकांनी वेळीच आग विझवण्यासाठी प्रयत्न केले त्यामुळे आग आटोक्यात आली. यासाठी नारायणगाव ग्रामपंचायत चे अग्निशमन टँकर, विघ्नहर कारखाना व जुन्नर नगर परिषदेचे अग्निशमन बंब यांना बोलवण्यात आले अवघ्या अर्ध्या तासात ही यंत्रणा आल्यामुळे पुढील दुर्घटना टळली. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे, उपनिरीक्षक जगदेव पाटील, हवालदार मंगेश लोखंडे,नारायणगावचे उपसरपंच योगेश पाटे, विकास सोसायटीचे उपाध्यक्ष किरण वाजगे, सोमनाथ डोके, निलेश जाधव, आपदा मित्र पोलीस पाटील सुशांत भुजबळ, प्राध्यापक राहुल घाडगे, धनेश पडवळ, त्र्यंबक टकले, वैभव शिंदे, वैभव चिंचवडे, विनोद जाधव, अजित बनकर, ग्रामपंचायत सदस्य गणेश पाटे, बाळा वाव्हळ यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी मोठे परिश्रम घेतले.