विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा
उद्धव ठाकरे यांच्या सेनेचे मंगेश काकडे यांचे शिवसेनेत जाण्याचे अंतिम झाल्याची खबर प्राप्त झाल्याने दोन्ही राष्ट्रवादीकडून पिंपळवडी गटातून विजय कुऱ्हाडे यांची फायनल होऊ शकते. मंगेश काकडे यापूर्वी राष्ट्रवादीत येणार असल्याची चर्चा होत असल्याने कुऱ्हाडे यांच्या उमेदवारीला ब्रेक लागत होता. परंतु आता कुऱ्हाडे यांचा मार्ग मोकळा झाला असल्याचे बोलले जात आहे. सध्या कुऱ्हाडे प्रचारात खूप आघाडीवर आहेत.कुऱ्हाडे हे अतुल बेनके यांचे जवळचे मित्र माणले जातात.