लाला बँकेला “ ग्रीन वर्ल्ड को प्राईड २०२५ “ हा पुरस्कार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे हस्ते प्रदान
नारायणगाव:
लाला अर्बन को ऑप बँक लि. नारायणगाव या बँकेने सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षामध्ये कर्ज वितरणामध्ये उल्लेखनीय कामकाज केल्याबद्दल ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशन व कॉसमॉस को ऑप बँक लि. यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार मंथन २०२५ या आयोजित केलेल्या कार्यक्रमध्ये महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते पुणे येथे प्रदान करण्यात आला. बँकेने कर्ज वितरणामध्ये छोट्या उद्योगांना , सूक्ष्म व मध्यम उद्योजकांना, विविध उद्यमशील व्यक्तींना भांडवल उपलब्ध करून देत त्यांच्या व्यवसाय व उत्पन्न वृद्धीमध्ये महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्याचप्रमाणे कर्ज पोर्टफोलिओचे सुयोग्य नियोजन, व्यवस्थापनातील सक्षम धोरण, आर्थिक पारदरक्षता, सभासदांना लाभाउंश वितरण,तसेच रिझर्व्ह बँकेच्या सर्व वैधानिक मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करून बँकेने सदृढ, विश्वासार्ह समाजामध्ये निर्माण केला असल्याने हा पुरस्कार बँकेस मिळाला असल्याचे माहिती बँकेचे अध्यक्ष युवराज बाणखेले यांनी सांगितले. बँकेच्या वतीने उपाध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, संचालक नितीन लोणारी, संदीप लेंडे यांनी पुरस्काराचा स्वीकार केला. याप्रसंगी मा विद्याधर आनास्कर-प्रशासक राज्य सहकारी बँक, दीपक तावरे सहकार आयुक्त, सी ए मिलिंद काळे, डॉ. संजय कोलते, अॅड प्रल्हाद कोकरे आदी उपस्थित होते. बँकेच्या सध्या रु ५७३ कोटी ठेवी असुन रु ३६३ कोटीचे कर्ज वाटप असा एकूण ९३६ कोटींचा मिश्र व्यावसाय आहे. बँक आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि सुस्थितीत व्यवस्थापन (FSWM ) कॅटेगिरीमध्ये आहे. बँकेची मोबाईल बँकिंग सुविधा कार्यान्वित आहे.