बिबट्या पिंजऱ्याला घालतोय घिरट्या.महिना झाला बिबट्या काही पिंजऱ्यात अडकेना.


नारायणगाव : (प्रतिनिधी) काळवाडी (ता. जुन्नर) परिसरामध्ये बिबट्याची दहशत मोठ्या प्रमाणात असून या परिसरातील शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर या बिबट्याने अनेकदा हल्ला करून फस्त केली आहेत. येथे बिबट्याला पकडण्यासाठी एक महिन्यापासून पिंजरा लावलाय हा बिबट्या पिंजऱ्याला गिरट्या घालतोय परंतु पिंजऱ्यात काही येत नाही त्यामुळे वन खात्याने या बिबट्याला पकडण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक शेतकरी वर्गाने केली आहे.     संपत वामन यांच्या घराजवळ हा बिबट्या वारंवार येत आहे. सीसीटीव्ही कॅमेरा हा बिबट्या अनेकदा कैद झाल्यामुळे त्यांनी वनखात्याकडे तक्रार केल्यानंतर वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी या परिसरात पिंजरा लावला आहे. अनेकदा पिंजऱ्याची जागा देखील बदलली आहे. परंतु बिबट्या काही पिंजरा देत नाही तो वन खात्याला हुलकावणी देतोय. बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यामध्ये त्याला भक्ष म्हणून कोंबडी ठेवलेली आहे. हे भक्ष खाण्यासाठी तो पिंजऱ्याभोवती गिरट्या घालतो परंतु पिंजऱ्यात येत नसल्यामुळे शेतकरी वर्गाला चिंता लागली आहे.      बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरातील शाळकरी मुलांची मोठी गैरसोय होत असून त्यांना शाळेत सोडण्यासाठी व आणण्यासाठी  पालकांना कसरत करावी लागत आहे. ज्येष्ठ व्यक्ती व शाळकरी मुलांना बिबट्याच्या भीतीमुळे अन्नामध्ये खेळता देखील येत नाही. मुलांचा अभ्यास झाल्यावर त्यांना अंगणात खेळायला पालकांना पाठवता येत नसल्यामुळे मोबाईलच त्यांच्या हातामध्ये देणे याशिवाय पालकांकडे दुसरा पर्याय नाही. त्यामुळे या मोबाईलमुळे मुलांकडून मोबाईलचा गैरवापर होण्याची भीती पालक वर्गाकडून व्यक्त होत आहे.   दरम्यान काळवाडी या ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यात एक महिना झाला तरी बिबट्या येत नसल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून वनविभागाने या संदर्भामध्ये गांभीर्याने उपाययोजना करावी बिबट्याच्या हल्ल्यात काही दुर्घटना घडली तर मात्र वनविभागाचे गळे केले जाणार नाही असा इशारा संपत वामन यांनी दिला आहे    ओतूरचे वनक्षेत्रपाल चैतन्य कांबळे यांच्याशी भ्रमणध्वनी संपर्क साधला असता ते म्हणाले की, काळवाडी या ठिकाणी लावलेल्या इंग्रजी जागा बदलण्यात येईल. बोल लवकर हा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद कसा होईल याबाबतचे दक्षता घेण्यात येईल.

जाहिरात

error: Content is protected !!