वारुळवाडी तीन बंद घरं चोरट्यांनी फोडली.

नारायणगाव : ( प्रतिनिधी ) वारूळवाडी (ता. जुन्नर) येथे बुधवारी (दि. 17) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास तीन बंद घरं चोरट्यानीं फोडली असून एका घराचे लोखंडी खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला. घरातील कपाटातील साहित्य इतरत्र चोरट्यांनी फेकून दिले. डोंगरे कुटुंब देवदर्शनासाठी पंढरपूरला गेले असल्यामुळे त्यांच्या कपाटामध्ये काही दागिने व पैसे होते का? याबाबतची माहिती मात्र उपलब्ध होऊ शकली नसल्याची माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांनी दिली. दरम्यान याबाबत नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ठसे तज्ञ व डॉग स्कॉड देखील पाचारण करण्यात आले. या चोरट्यांनी दोन दिवसापूर्वी या बंद घराची रेकी केली असल्याचे समोर आले आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये तसे दिसून येत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. याबाबत अधिक समजलेली माहिती अशी की, वारुळवाडी येथील अनिकेत दत्तात्रय डोंगरे, सागर भागवत व शेखर सोलाट या तिघांची बंद घरे चोरट्यांनी फोडली. सोलाट व भागवत यांच्या घरातील काहीही चोरीला गेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तथापि अनिकेत दत्तात्रय डोंगरे यांच्या बंद घराची दर्शनी भागातील खिडकीचे लोखंडी गज कटरने कापून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील सगळे कपडे इतरत्र फेकून दिले. तसेच कपाटातील साहित्य इतरत्र टाकून दिले. दरम्यान कपड्यात दागिने व पैसे होते किंवा कसे हे मात्र समजू शकले नाही. डोंगरे कुटुंब हे पंढरपूरला देव दर्शनाला गेले असल्यामुळे ते आल्यानंतरच खरी वस्तुस्थिती समोर येईल अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांनी दिली. दरम्यान मागील आठवड्यामध्ये नारायणगावच्या कोल्हे माळ्यातील अशाच प्रकारे सहा बंद फ्लॅट चोरट्यांनी फोडले आहेत.त्यावेळी सोन्याचे दागिने व रोख रक्कम या चोरट्यांनी लंपास केली आहे. आता पुन्हा वारुवाडीला चोरी झाल्यामुळे परिसरातील जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी अधिक प्रमाणामध्ये गस्त सुरू करावी अशी मागणी नारायणगाव व वारूळवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान अनिकेत दत्तात्रय डोंगरे यांच्या खिडकीचे ग्रील तोडून अज्ञात चोरट्यांनी बंद घरात प्रवेश करून कपाटातील सुमारे सहा तोळे सोन्याचे दागिने व २५ तोळे चांदीचे दागिने, रोख रक्कम असा ऐवज चोरीला गेला आहे. चोरीची घटना आज पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
चोरी झाल्याचा दुजोरा नारायणगाव पोलिसांनी दिला असून याप्रकरणी चौकशी सुरू आहे. नक्की किती रुपयांचा ऐवज गेला ही माहिती घेण्याचे काम सुरू आहे.अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी दिली.

जाहिरात

error: Content is protected !!