अशोक दरेकर यांच्या बंगल्यात प्रवेश करणाऱ्या बिबट्याला तीन जिगरबाज कुत्र्यांनी पळून लावले.


नारायणगाव :

जुन्नर तालुक्यातील गुंजाळवाडी येथील अशोक विठ्ठल दरेकर यांच्या बंगल्यावर कुत्र्यांची शिकार करण्यासाठी आलेल्या बिबट्याला तीन बहादूर कुत्र्यांनी पिटाळून लावले.ही घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहे. जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांच्या मोठ्या प्रमाणात वावर वाढला असून शेतकरी वर्ग या बिबट्याचे उपद्रमाने त्रस्त झाला आहे. दररोज कुठे ना कुठे या बिबट्याचा पाळीव प्राण्यांवर अथवा मानवावर हल्ला. शेतकऱ्यांनी आपली पाळीव प्राणी सुरक्षित ठेवण्यासाठी उंच जाळीचे कंपाउंड केले आहे. एवढेच काय तर स्वतःच्या घराभोवती देखील लोखंडी जाळीचे अथवा सिमेंटचे कंपाउंड केले आहे. चोरट्यांचा उपग्रह होऊ नये म्हणून काही शेतकऱ्यांनी पाळीव कुत्री पाळली आहेत. परंतु बिबट्या या पाळीव कुत्र्यांचा फडशा पाडत आहे. जुन्नर तालुक्यातील सावरगाव रस्त्याला असलेल्या गुंजाळवाडी येथील रस्त्याच्या आत मध्ये अशोक विठ्ठल दरेकर राहत आहेत. तुरटन पासून बचाव व्हावा यासाठी त्यांनी तीन कुत्री पाळली आहेत. रात्रीच्या वेळेला ही कुत्री कंपाऊंडच्या आत मध्ये मोकळे असतात. दरम्यान दोन दिवसांपूर्वी नेहमीप्रमाणे त्यांनी आपली पाळीव कुत्री कंपाऊंडच्या आत मध्ये मोकळी सोडली असता पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास कुत्र्याची शिकार करण्यासाठी आलेल्या बिबट्याने बंगल्याच्या संरक्षण भिंतीवर उडी मारण्याचा प्रयत्न केला. गेट जवळ भिंतीवर हा बिबट्या बसला. बिबट्या भिंतीवर बसल्याचे या तीनही कुत्र्यांनी पाहिले व ते जोरजोरात ओढू लागले. कुत्र्यांच्या जोराच्या भुंकण्याने व त्यांचा आक्रमकपणा पाहून आपला या कुत्र्यांमुळे निभाव लागणार नाही हे ओळखून बिबट्याने कंपाऊंडच्या बाहेर धूम ठोकली व बाजूच्या शेतात पळून गेला. दरम्यान या परिसरामध्ये बिबट्याचे वास्तव्य असून अनेक शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ले होत आहेत. वनविभागाने तातडीने याबाबतची दखल घेऊन बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी अशोक दरेकर यांनी केली आहे.

जाहिरात

error: Content is protected !!