सभासदांना दिवाळी निमित्त भेट वस्तूंचे वितरण.

नारायणगाव : (प्रतिनिधी) वडगाव आनंद विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून सर्व सभासदांना दिवाळी भेट वाटप शुभारंभ गावातील सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या शुभहस्ते करण्यात आला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष सचिन वाळुंज उपाध्यक्ष प्रमोद गडगे, सर्व संचालक, राजू शेठ चौगुले, नितीन वाळुंज, श्रीधर शिंदे, रघुनाथ चौगुले,लहू रायकर, तान्हाजी देवकर,मारुती शिंदे, रोहित गागरे, रवींद्र भुजबळ, स्वप्नील मोरे,निमेश वाळुंज, अशोक पादीर, संतोष पादीर, शशिकांत देवकर, वैशाली देवकर यांच्या उपस्थित झाला. दरम्यान यावेळी बोलताना सचिन वाळुंज म्हणाले की, सोसायटीच्या सर्व सभासदांची संस्था नेहमी हिताचा विचार करीत असते. संचालक मंडळ व सभासद यांचा समन्वय असल्यामुळे संस्थेला नफा चांगला होतो. कर्ज वसुली वेळेत होत असते. जुन्नर तालुक्यामध्ये वडगाव आनंद विविध कार्यकारी सोसायटी नेहमीच शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवणारी तालुक्यातील एकमेव विकास सोसायटी आहे. जे की सभासदांना वेगवेगळ्या पिकांचे मार्गदर्शन, माती परिषण, रास्त भावात शेतकरी सभासदांना साठी बियाणे उपलब्ध करणे, शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात शेती उपयोगी वस्तूंचा ड्रॉ करणे, त्यातून शेतकऱ्यांना शेती उपयोगी वस्तूंनी उपलब्ध करून देणे या आणि अशा अनेक उपक्रमांसाठी वडगाव आनंद विविध कार्यकारी सोसायटी ही नेहमीच तालुक्यामध्ये चर्चेत राहिलेली आहे. @फोटो खालील ओळ – सभासदांना दिवाळी निमित्त भेटावस्तु संचालक मंडळाच्या वतीने देण्यात आल्या. (छाया – सुरेश वाणी.)

जाहिरात

error: Content is protected !!