बिबट्याच्या दहशतीने पालकांनी मुलांना शाळेत पाठविणे केले बंद.

बl

नारायणगाव : (प्रतिनिधी) पिंपळवंडी परिसरामध्ये बिबट्याचे दर्शन दररोज होत असून बिबटयाची दहशत अधिक प्रमाणात वाढत असल्याने शेतात वस्ती करून राहणाऱ्या पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवणे बंद केले आहे. पिंपळवंडी परिसरातील काकटपट, गाजरपट, तोतरबेट परिसरामध्ये बिबट्याचे दहशत अधिक प्रमाणात असून दररोज बिबट्याचे दर्शन परिसरामध्ये होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झाली आहे. बिबटयाच्या भीतीने शेतकऱ्यांना शेतामध्ये काम करणे अवघड होऊन बसले आहे.तसेच दुबत्या जनावरांना हिरवा चारा शेतातून काढणे हे सुद्धा शेतकऱ्यांसाठी मोठे मुश्किलीचे झाले आहे. एवढेच काय तर दिवसभर आपल्या मुलांना घराबाहेर काढता येत नाही आणि जी मुलं शाळेत जातात त्यांना बिबट्याच्या भीतीने शाळेत पाठवणे देखील या परिसरामध्ये बंद करण्यात आले आहे. लहान मुलांना अंगणात खेळण्यास सुद्धा पालकांनी बंदी घातली असून या चिमण्यांना आपल्या घरातच बंदिस्त खेळावे लागत आहे. दरम्यान दसऱ्याच्या दिवशी मयूर नेताजी वाघ यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न बिबट्याने केला होता. त्यावेळी घरातील तीन मुले, त्यांची मुलगी व पत्नी यांनी बिबट्याला पिटाळून लावले होते. यात घराजवळ अनेक महिने बिबट्याचा दररोज वावर असल्याने काकडे यांनी आपली तीनही मुलं शाळेत पाठवणे बंद केले असून त्यांचा अभ्यास घरी घेतला जात आहे. अशीच परिस्थिती परिसरामधील शेतकऱ्यांची असल्याचे त्यांनी सांगितले. पिंपळवंडीच्या तोतरबेट येथील शेतकरी अंकुश तोत्रे म्हणाले की, आमच्या मळ्यामध्ये गेल्या महिनाभरापासून दोन बिबटे फिरत आहेत. या दोन बिबट्याच्या भीतीने परिसरातील लोक त्रस्त आहेत. शनिवारी रात्री सात वाजताच्या सुमारास आमच्या घराशेजारी राहत असलेले शेतकरी अरुण गाजरे यांच्या गायीच्या गोठ्यामध्ये दोन बिबटे आले व त्यांनी संबंधित शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर वासरू ठार केले. रविवारी सकाळी याच परिसरामध्ये मजूर सोयाबीनचे पीक काढत असताना त्यांना उसाच्या कडेला बिबट्या दिसला. दरम्यान गाजरे यांच्या कालवडीचा फडशा पडणाऱ्या दोन बिबट्यांना पकडण्यासाठी वन खात्याने पिंजरा मात्र लावलेला नाही. आमच्या भागात दोन मोठे नर्व्हस मादी बिबटे अनेक दिवसांपासून असून परिसरातील लोक प्रचंड भीतीच्या छायेखाली आहे तालुक्याचे आमदार शरद सोनवणे आमच्या गावचे आहेत त्यांनी यात लक्ष घालावे अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान वर्ष भराच्या दरम्यान याच परिसरामध्ये शरद सोनवणे यांनी बिबट मुक्त तालुका होण्यासाठी उपोषण केले होते.”एकतर बिबट्या राहील अथवा मी” अशी त्यांनी भूमिका घेतली होती. विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी एक तर बिबट्या राहील अथवा मी असे सांगत ते आमदार म्हणून निवडून आले. सोनवणे आमदार झाले परंतु बिबट बुद्ध तालुका झाला नाही, या उलट बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने जनतेचा आक्रोश तीव्र वाढला आहे. दररोज कुठे ना कुठे बिबट्याचा पाळीव प्राण्यावर हल्ला होत असल्याचे निदर्शनात येत आहे. दरम्यान वनविभागाचे वनक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण म्हणाले की पिंपळवंडी परिसरामध्ये बिबट्यांची संख्या वाढली आहे. मयूर वाघ यांच्या घराजवळ विठ्ठला पकडण्यासाठी गजरा लावला आहे. तसेच गाजरपट या ठिकाणी देखील बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावणार आहोत.

जाहिरात

error: Content is protected !!