नारायणगाव : ( प्रतिनिधी )वारुळवाडी येथे मीना नदीच्या काठावर झोपड्या बांधून राहणाऱ्या कातकरी आदिवासी समाजातील पाच कुटुंबातील पंधरा नागरिकांना नारायणगाव पोलिसांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान सततच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वडधारणातून मीना नदी पात्रात पाणी सोडल्याने वारूळ वाडी आणि नारायणगाव यांना जोडणारा मीना नदीवरील दोन पूल पाण्याखाली गेले आहेत. कुकडी पाटबंधारे विभागाच्या वतीने मीना नदी काठावर असलेल्या शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
कुकडी प्रकल्पांतर्गत माणिक डोह धरणाचा अपवाद वगळता डिंभे,येडगाव,वडज, चिलेवाडी, पिंपळगाव जोगा या धरणात शंभर टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. कुकडी प्रकल्पात सरासरी 91 टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. मागील तीन वर्षात प्रथमच 90 टक्क्या पेक्षा जास्त उपयुक्त पाणीसाठा कुकडी प्रकल्पात झाला आहे.वडज धरण 100 टक्के भरले आहे. पूर नियंत्रणासाठी वडज धरणातून बारा हजार क्यू सेक्स पाणी सोडल्याने मीना नदीला पूर आला आहे. कुकडी पाटबंधारे विभागाच्या वतीने नदीकाठच्या नागरिकांना सावधनतेचा इशारा देण्यात आला आहे. त्या दृष्टीने नदी काठावर असलेल्या निमदरी,सावरगाव, येणेरे, गुंजाळवाडी, आर्वी, वारूळवाडी, नारायणगाव या ग्रामपंचायतीने आपल्या परिसरात सकाळी दवंडी देऊन
नागरिकांना सतर्क केले आहे. वारूळवाडी येथे मीना नदी काठावरील पाच झोपड्या मध्ये राहणाऱ्या
कातकरी आदिवासी समाजातील सोमनाथ कैलास पवार,संगीता वाघमारे,प्रकाश वाघमारे,लक्ष्मी हीलम,सुनीता वाघ,अनिता गणेश पिंपळे,शांताराम शंकर गोतारणे,रतन शंकर हिलम, विलास मारुती वाघमारे,सरोजा पवार, मारुती जाधव,
सखुबाई धर्मा हीलम, नवनाथ पवार,भारती गणेश पिंपळे, पायल गणेश पिंपळे, टप्पू सरोजा या 15 नागरिकांना नारायणगाव पोलिसांनी सुरक्षित स्थळी हलवले आहे त्यामुळे संभाव्य धोका टाळला आहे.