सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास नारायणगाव ग्रामपंचायत करणार एक हजार रुपये दंड. ग्रामपंचायतीला फोटो पाठवणारास ग्रामपंचायत देणार 500 रुपये बक्षीस.

नारायणगाव : ( प्रतिनिधी ) नारायणगाव (ता. जुन्नर) येथे ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित ग्रामसभा ही गावकऱ्यांच्या उपस्थितीत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सरपंच शुभदा वावळ उपसरपंच बाबू पाटे यांनी दिली. या ग्रामसभेचे अध्यक्षस्थान नारायणगाव शहराच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच शुभदा वाव्हळ यांनी भूषविले होते. ग्रामसभेमध्ये ग्रामसेवक सचिन उंडे यांनी ग्रामसभेत विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन केले. दरम्यान सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या व्यक्तीला 1000 रुपये दंड व याबाबतचा फोटो पाठवणाऱ्या व्यक्तीला पाचशे रुपये बक्षीस तसेच कचरा टाकणाऱ्या व्यक्तीचा सार्वजनिक ठिकाणी फ्लेक्स लावून त्या व्यक्तीच्या घरी जाऊन त्याचा फोटो काढून सत्कार करण्याची गांधीगिरी करण्याचा ठराव या बैठकीमध्ये संमत करण्यात आला. ग्रामसभेत वीज, पाणी, रस्ते, शेतकऱ्यांसाठी पाणंद रस्ते, अंगणवाडी सेविका, स्वच्छता व आरोग्य त्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी आदी विषयावर चर्चा झाली. घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापन निमित्त केंद्र शासनाकडे प्रस्ताव सा केला असून तो मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच गावातील कॅमेरे तात्काळ दुरुस्ती आणि वाढविण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली. तसेच गावात कुणी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकताना दिसल्यास फोटो काढून ग्रामपंचायतीला पाठवल्यास त्याला ५०० बक्षिस व कचरा टाकनाऱ्याला १००० रु दंड व सार्वजनिक ठिकाणी त्याचा फ्लेक्स लावण्यात येणार असल्याचे व त्यांचा घरी जाऊन सत्कार करण्याचे सर्वानुमते ठरले. तसेच, em द्रावण प्रकल्प पाहणी करता आतापर्यंत २७ ग्रामपंचायतीने भेट दिली त्यांच्या गावात हा प्रकल्प टाकण्याचा त्यांचा मानस असल्याने नारायणगाव ग्रामपंचायत रोल मॉडेल म्हणून महाराष्ट्रात पोहचली असल्याचे सरपंच शुभदा वावळे यांनी सांगितले बिल्डिंग बांधकाम झाल्यानंतर त्यामध्ये झाडे, ड्रेनेज,एस टी पी प्लांट बसविणे, पावसाचे पाणी पुनर्भरणा व्यवस्था केल्याशिवाय बिल्डिंगची नोंद ग्रामपंचायत दप्तरी नोंद होणार नसल्याचा ठराव यावेळी संमत करण्यात आला. सर्व घरे, सोसायटी यांना सोलर सिस्टिम बसविण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार असून त्यामुळे नारायणगावची सोलर सिटी म्हणून ओळख निर्माण होईल यासाठी उपाययोजना करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. दरम्यान शनिवारच्या बाजारात भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून भैरवनाथ मंदिरापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने या बाजीविक्रेत्यांना बसण्याची व्यवस्था करण्यात यावी असे यावेळी ठरवण्यात आले. नारायणगाव परिसरांमधून जे कालवे गेले आहेत त्यावरील रस्ते दुरुस्ती करावेत जेणेकरून शेतकऱ्यांचा शेती माल बाहेर काढणे सोयीचे होईल याविषयी देखील या बैठकीमध्ये संबंधित विभागाला पत्र व्यवहार करण्याचे ठरले. ग्रामभे प्रसंगी सभेचे अध्यक्ष सरपंच शुभदा वाव्हळ, उपसरपंच योगेश पाटे, ग्रामपंचायत नारायणगावचे मार्गदर्शक श्री.संतोष खैरे, यांनी मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाणी यांनी काही समस्यांकडे लक्ष वेधले तर मा. श्री. निलेश गोरडे यांनी ग्रामपंचायत कारभाराबाबत समाधान व्यक्त केले. अंगणवाडी सेविका व महिला भगिनींनी उपस्थित केलेल्या समस्या त्वरित सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले. या सभेसाठी माजी उपसरपंच संतोष वाजगे, विकास तोडकरी, अजित वाजगे, सचिन विटे, भगवान कोऱ्हाळे, दीपक डेरे, जितेंद्र भोर,नंदू अडसरे व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते. या सभेचे प्रस्ताविक सदस्य गणेश पाटे व आभार हेमंत कोल्हे यांनी मानले.

जाहिरात

error: Content is protected !!